Former Union Minister Harsimrat Kaur Badal

शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मागे घेण्यासाठी आम्ही झालोय त्यांचा आवाज – माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल

देश

माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज भटिंडा येथील तख्त श्री दमदमा साहिब या गुरुद्वाराला भेट दिली, हरसिमरत कौर या शिरोमणी अकाली दलातर्फे होत असलेल्या शेतकरी विरोधी कायद्याविरोधातल्या आंदोलनाचं नेतृत्त्व करत आहेत, कृषि कायद्यांना विरोध दर्शवतच त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर शिरोमणी अकाली दल एनडीएतूनही बाहेर पडलं. आता आम्ही शेतकऱ्यांचा आवाज झालो आहोत असं वक्तव्य त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मागे घेण्यासाठी आम्ही त्यांचा आवाज झालो आहोत असं वक्तव्य शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केलं आहे. “अकाली दलाने शेतकऱ्यांवर लादण्यात आलेले काळे कायदे मोदी सरकारतर्फे मागे घेतले जावेत म्हणून अपार संघर्ष केला. त्यासाठी आम्ही NDA मधून बाहेर पडलो, पदं सोडली, मोदी सरकारसोबत असलेले सौहार्दाचे संबंध तोडून टाकले. आता अकाली दल हा शेतकऱ्याचा आवाज झाला आहे आम्ही कायमच शेतकऱ्यांच्या हिताच्या बाजूने आहोत” असं वक्तव्य हरसिमरत कौर यांनी केलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत