१ ऑक्टोबरपासून लॉकडानच्या पाचव्या टप्प्याला सुरुवात झाली असून ठाकरे सरकारकडून आणखी काही निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात राज्यात काय सुरु झालं आहे आणि काय बंद राहणार आहे.
- ५० टक्के क्षमतेत उपहारगृहे, फूड कोर्ट आणि बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- राज्यांतर्गत रेल्वेसेवा (मुंबई-पुणे, कोल्हापूर, सोलापूर, औरंगाबाद, नागपूर, रत्नागिरी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली आहे.
- मुंबईच्या धर्तीवर पुणे शहरातील उपनगरीय रेल्वे सेवा सुरु होणार.
- मुंबईतील डबेवाल्यांना क्यूआर कोडच्या माध्यमातून रेल्वेतून प्रवास करण्याची परवानगी.
- मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या हद्दीतील सर्व उद्योग, आस्थापना सुरु करण्यास मुभा.
- केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांमधे मुंबई उपनगरीय रेल्वेसेवा सर्वांसाठी सुरु करण्याबाबत स्पष्टता नसल्याने त्या सुरु होण्याच्या प्रतिक्षेत असलेल्यांची निराशा झाली आहे.
- मेट्रो बंदच राहणार आहे.
- धार्मिकस्थळं सुरु करण्याची विरोधकांची मागणी सरकारने मान्य केलेली नाही. त्यामुळे ती बंदच राहणार आहे.
- केंद्राने शाळा-महाविद्यालयं तसंच शैक्षणिक संस्था १५ ऑक्टोबरपासून सुरु करण्यास मुभा दिला आहे. मात्र निर्णयाची जबाबदारी राज्य सरकारांकडे सोपवण्यात आली आहे. राज्याने मात्र बंदी कायम ठेवली आहे.
- चित्रपटगृहं १५ ऑक्टोबरपासून सुरु कऱण्यासाठी केंद्राने परवानगी दिली आहे. राज्याने मात्र यासाठी नकार दिला आहे.
- व्यायामशाळा सुरु करण्यासाठी केंद्राने याआधीच परवानगी दिली आहे, राज्याने मात्र यासाठी अनुमती दिलेली नाही.
- तरणतलाव, नाट्यगृह, सभागृह, राजकीय, क्रीडा, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम बंदच राहणार आहेत.
- आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतूक बंद राहणार आहे.
दरम्यान लॉकडाउन ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू राहणार असून सध्या कायम असलेले निर्बंध यापुढेही लागू राहणार आहेत.




