Sourav Ganguly readmitted to hospital
क्रीडा

सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली, रुग्णालयात दाखल

बीबीसीआयचे अध्यक्ष आणि टीम इंडियाचे माजी क्रिकेट कर्णधार सौरव गांगुली यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. सौरव गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर 7 जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. 2 जानेवारी रोजी सौरव गांगुली यांना हृदयविकाराचा सौम्य झटका […]

BJP state spokesperson Ajfar Shamsi shot in Munger
देश

भाजप प्रदेश प्रवक्ते अजफर शम्सी यांच्यावर भरदिवसा गोळीबार

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात भाजपच्या प्रदेश प्रवक्त्याला भरदिवसा गोळ्या घालण्यात आल्या आहेत. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अजफर शम्सी असे या नेत्याचे नाव आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. मुंगेरच्या इवनिंग कॉलेजजवळ दबा धरून बसलेल्या मारेकऱ्यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्त अजफर शम्सी यांच्यावर गोळ्या झाडल्या. शम्सी यांना दोन […]

The craze of FAU-G, the number of downloads of this game in 24 hours is more than 10 lakhs
तंत्रज्ञान

FAU-G ची क्रेझ, 24 तासांमध्ये हा गेम डाउनलोड करणाऱ्यांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त

FAU-G मोबाईल गेम प्रजासत्ताक दिनी भारतात लाँच झाला. कालपासून हा गेम गुगल प्ले-स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केला आहे. लाँचिंगपूर्वीच FAU-G मोबाईल गेमबाबत गेमप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता होती. लाँच होण्यापूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर आता आकडेवारीवरुन अवघ्या 24 तासांमध्ये 10 […]

Supreme Court stays Nagpur bench's controversial verdict in sexual harassment case
महाराष्ट्र मुंबई

लैंगिक शोषण प्रकरणात नागपूर खंडपीठाच्या ‘त्या’ वादग्रस्त निकालाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : अल्पवयीन मुलीच्या अंगावरील कपडे न काढता तिच्या मर्जीशिवाय शरीराला हात लावण्याची क्रिया म्हणजे लैंगिक शोषण नव्हे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या या वादग्रस्त निकालाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. नागपूर खंडपीठाच्या निकालामुळे धोकादायक उदाहरण प्रस्थापित होईल, असं अॅटर्नी जनरल यांनी आपल्या निवेदनात म्हटलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या वादग्रस्त निर्णयाला स्थगिती […]

The thrilling story of the martyr Major Mohit Sharma who lived with the terrorists and shot them
देश

देशप्रेम : दहशतवाद्यांसोबत राहून त्यांचा खात्मा करणारे शहीद मेजर मोहित शर्मा यांची चित्तथरारक कहाणी

भारताच्या संरक्षणार्थ तत्पर असणाऱ्या सैन्यदलाच्या सेवेत असताना शहीद मेजर मोहित शर्मा यांनी अशी काही कामगिरी केली, जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी देशप्रेमाचा एक आदर्श ठेवून गेली. देशाप्रती कमालीचं प्रेम असणाऱ्या या व्यक्तीनं या जगाचा निरोप घेतला असला तरीही त्यांच्या योगदानाविषयी वाचताना उर अभिमानानं भरुन येतो. दहशतवाद्यांमध्ये राहून त्यांचा खात्मा करण्याचं धाडसी आणि महान कार्य मेजर मोहित […]

Serial killer arrested, 18 women killed after wife ran away with another man
देश

सिरियल किलरला अटक, पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याच्या रागातून १८ महिलांची हत्या

हैदराबाद पोलिसांनी मंगळवारी महिलांची हत्या करणाऱ्या सिरियल किलरला अटक केली आहे.या ४५ वर्षीय आरोपीने १८ महिलांची हत्या केली असल्याचं समोर आलं आहे. अटक केल्यानंतर नुकत्याच दोन महिलांच्या झालेल्या हत्या प्रकरणाचा उलगडाही झाला आहे. वृत्तानुसार, याआधी त्याला २१ प्रकरणांमध्ये अटक करण्यात आली आहे. यामध्ये १६ हत्या, संपत्तीशी संबंधित चार गुन्ह्यांचा समावेश आहे. एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा […]

High alert in Punjab after violence during farmers agitation
देश

शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट

प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारानंतर पंजाबमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीने हिंसक वळण घेतलं. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर साहिब ए निशाण ध्वज फडकावला. तर दुसरीकडे पोलीस आणि शेतकरी यांच्यात प्रचंड धुमश्चक्री झाली. या […]

Dr. Dhawalsinh Mohite Patil will join the Congress
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला धक्का, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

सोलापूर : सोलापुरातील नेते डॉ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या (28 जानेवारी) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईत काँग्रेस भवनमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. मोहिते पाटील अगोदर शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. आता ते काँग्रेसमध्ये जाणार आहेत. डॉ धवलसिंह यांनी स्वत: या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजपसह असलेल्या […]

The state government has expressed displeasure over the Padma awards
महाराष्ट्र

पद्म पुरस्कारांवरून राज्य सरकारने व्यक्त केली नाराजी, शिफारशी डावलल्याचा आरोप

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण पद्म पुरस्काराविषयीच्या राज्य सरकारच्या शिफारशी केंद्राने डावलल्याचा आरोप आता महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे. राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी […]

prakash ambedkar
देश महाराष्ट्र शेती

केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ : प्रकाश आंबेडकर

अकोला : नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसेवर देशभरात केंद्र आणि भाजपवर टीका होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर टीका करतांनाच काँग्रेस-राष्ट्रवादीवर गंभीर आरोप लावले आहेत. केंद्राच्या शेतकरी कायद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध म्हणजे निव्वळ ‘नौटंकी’ आणि ‘तमाशा’ असल्याची बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केंद्राच्या सध्याच्या […]