The craze of FAU-G, the number of downloads of this game in 24 hours is more than 10 lakhs

FAU-G ची क्रेझ, 24 तासांमध्ये हा गेम डाउनलोड करणाऱ्यांची संख्या 10 लाखांपेक्षा जास्त

तंत्रज्ञान

FAU-G मोबाईल गेम प्रजासत्ताक दिनी भारतात लाँच झाला. कालपासून हा गेम गुगल प्ले-स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लाँचिंगपूर्वीच FAU-G मोबाईल गेमबाबत गेमप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता होती. लाँच होण्यापूर्वीच 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी या गेमसाठी प्री-रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यानंतर आता आकडेवारीवरुन अवघ्या 24 तासांमध्ये 10 लाखांपेक्षा जास्त युजर्सनी हा गेम डाउनलोड केल्याचं समोर आलं आहे. या गेमची साइज 460 MB आहे. या गेमला प्ले-स्टोअरवर युजर्सकडून 4.7 रेटिंग मिळाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत