Samsung Galaxy M32 5g

Samsung Galaxy M32 5G स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स…

गॅझेट्स तंत्रज्ञान

नवी दिल्ली : सॅमसंगचा Galaxy M32 5G हा स्मार्टफोन आज भारतात लॉन्च होणार आहे. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर लिस्ट करण्यात आले आहे. Amazon वरील मायक्रोसाइटवर या फोनच्या फीचर्सची माहिती मिळते. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसर आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. या फोनची किंमत जवळपास २० ते २५ हजार रुपये असू शकते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

Samsung Galaxy M32 5G आज दुपारी १२ वाजता लॉन्च करण्यात येणार आहे. हा फोन Amazon, Samsung.com आणि प्रमुख रिटेल स्टोअर्सवरून २ सप्टेंबरपासून खरेदी करू शकता.

Samsung Galaxy M32 5G चे फीचर्स :

  1. या फोनमध्ये वॉटरड्रॉप-स्टाइल नॉच डिस्प्ले देण्यात आला आहे.
  2. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील मिळेल. याचा प्रायमरी सेंसर ४८ मेगापिक्सल असेल.
  3. फोन मीडियाटेक डायमेंसिटी ७२० प्रोसेसरसह येईल. सेल्फीसाठी यात १३ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.
  4. पॉवरसाठी यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल.
  5. यात १२ ५जी बँडचा सपोर्ट मिळेल.
  6. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्टनुसार, फोनमध्ये ६.५ इंच एचडी+ टीएफटी इन्फिनिटी व्ही डिस्प्ले मिळेल, याचे रिझॉल्यूशन ७२०x१६०० पिक्सल आहे.
  7. यावर कॉर्निंग गोरिला ग्लास ५ प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
  8. फोन ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येईल.
  9. यात ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळेल.
  10. फोनचा दुसरा सेंसर ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस, तिसरा ५ मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा आणि चौथा २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर असेल.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत