नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील 119 कर्तृत्ववान व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर केला आहे. त्यात महाराष्ट्रातील 6 जणांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पण पद्म पुरस्काराविषयीच्या राज्य सरकारच्या शिफारशी केंद्राने डावलल्याचा आरोप आता महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.
राज्यातील ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी केंद्राकडे 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस केली होती. त्यात उद्योगपती मुकेश अंबानी तसेच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचेही नाव होते. मात्र, राज्य सरकारने शिफारस केलेल्या 98 नावांपैकी केवळ ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्रीचा बहुमान मिळाला. त्यामुळे पद्म पुरस्कारांवरून आता राज्य सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.




