Republic Day celebrations at MIMER Medical College and Dr. Bhausaheb Sardesai Talegaon Rural Hospital
पुणे महाराष्ट्र

एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय व डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

आज २६ जानेवारी २०२१ रोजी आपल्या देशाचा ७२ वा प्रजासत्ताक दिन प्रमुख पाहुणे म्हणून माईर भौतिकोपचार महाविद्यालयाची विद्यार्थिनी डॉ. आयुषी शहा व मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे प्राचार्य कर्नल डॉ. राजेंद्रप्रसाद गुप्ता व कार्यकारी संचालक डॉ. सुचित्रा नागरे यांची भाषणे झाली. व्यासपीठावर संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश घैसास, कार्यकारी संचालक डॉ. […]

MNS files fraud complaint against Energy Minister Nitin Raut
महाराष्ट्र मुंबई

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरोधात मनसेकडून फसवणूकीची तक्रार दाखल

मुंबई : ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात आज मुंबईतील शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीमध्ये सरकारने वीजबिल प्रकरणी लवकरच ग्राहकांच्या हिताचा निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं होतं. परंतु, अद्याप याबाबत काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यांनी एकप्रकारे ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून याआधी अनेकवेळा सरकारशी पत्रव्यवहार करण्यात आला होता. […]

Police
महाराष्ट्र

खास सेवेसाठी राज्यातील एकूण ५७ पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र शासनाने महाराष्ट्र पोलीस दलातील ५७ अधिकारी, अंमलदारांची शौर्य पदकासाठी, उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकांसाठी आणि गुणवत्तापूर्ण सेवेप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पोलीस पदकासाठी निवड केली. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. “शौर्य, कर्तबगारीमध्ये महाराष्ट्र पोलीस नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. त्यामुळेच आपल्या पोलिसांनी गणराज्यदिनी १३ शौर्य पदके, विशेष सेवेची […]

FAU-G game listed on Google Play Store
तंत्रज्ञान

भारतात FAU-G मोबाईल गेम आज होणार लॉन्च, 20% रेव्हेन्यू शहीद जवानांच्या कुटुंबियांना

FAU-G मोबाईल गेम आज भारतात लॉन्च होणार आहे. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सहकार्याने nCore गेम्सने हा गेम तयार केला आहे. त्याची पूर्व नोंदणी 30 नोव्हेंबरपासून सुरू झाली. या घोषणेनंतर तीन दिवसांतच १० लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी या खेळासाठी नोंदणी केली. आता हा आकडा 40 लाखांच्या पुढे गेला आहे. FAU-G गेम : FAU-G (निडर आणि युनायटेड रक्षक) हा […]

Central Government announces prestigious Padma Awards
देश

पद्म पुरस्कारांची घोषणा, ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार, जाणून घ्या संपूर्ण यादी

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली असून ह्या वर्षी एकूण ७ पद्मविभूषण, १० पद्मभूषण आणि १०२ पद्मश्री पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्राला एक पद्मभूषण आणि पाच पद्मश्री पुरस्कार मिळणार आहेत. पद्म पुरस्कारांच्या यादीत महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील 7 नामवंत व्यक्तींचा समावेश आहे. यंदाच्या पद्म पुरस्कारांच्या यादीत 29 महिला, 10 विदेशातील नागरिक […]

Blood donation camp at Talegaon Dabhade (Pune) on the occasion of Republic Day
पुणे महाराष्ट्र रक्‍तदान

प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे (पुणे) येथे रक्तदान शिबिर

पुणे : दि २६ जानेवारी २०२१ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त तळेगाव दाभाडे, पोलीस ठाणे तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे-४१०५०६ येथे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सी यांच्या वतीने गरवारे रक्त केंद्र व एम आय एम ई आर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने रक्त दान शिबिर सकाळी ८.३० ते दुपारी १२.०० पर्यंत असेल. […]

Actress Jayashree Ramaiah dies in suspicious circumstances
मनोरंजन

ब्रेकिंग : जयश्री रमैया या अभिनेत्रीचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू

कन्नड अभिनेत्री आणि बिग बॉस कन्नड स्पर्धक जयश्री रमैया यांचा संदिग्ध अवस्थेत मृत्यू झाला आहे. आज (25 जानेवारी) जयश्रीचा मृतदेह बंगळुरूमधील पुनर्वसन केंद्रात लटकलेल्या अवस्थेत आढळला. मिळालेल्या माहितीनुसार ही अभिनेत्री नैराश्याने ग्रासलेली होती. जयश्रीच्या मृत्यूमुळे संपूर्ण कन्नड इंडस्ट्रीत हळहळ व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी जयश्रीने सोशल मीडियावरही अशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यानंतर ती […]

crime
देश

मुख्याध्यापक दाम्पत्याने केली स्वतःच्या मुलींची हत्या, सूर्योदयासोबत जिवंत होतील असा केला दावा

अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी स्वतःच्या दोन मुलींची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोमवारी सतयुग सुरु होणार असल्यामुळे सूर्योदयाला दोन्ही लेकी पुन्हा जिवंत होतील, असा दावा या माता-पित्याने केला. अंधश्रद्धेतून आई-वडिलांनी मुलींचा अशा प्रकारे जीव घेतल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, आंध्र प्रदेशातील हे आरोपी दाम्पत्य उच्चशिक्षित असून दोघंही मुख्याध्यापक आहेत. आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यामधील मदनापल्ले […]

Deputy Chief Minister Ajit Pawar
महाराष्ट्र

कुणी काय लपवाछपवी केली, कुणाचं लग्न झालं होतं, झालं नव्हतं, हे सांगू का? अजित पवारांनी दिला इशारा

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचे आरोप मागे घेण्यात आले आहेत, असं असलं तरीही विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना चांगलंच फटकारलं आहे. मागच्या काळात कुणी काय लपवाछपवी केली, मला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत, सांगू का?, असा सवाल अजित पवार यांनी विचारला आहे. अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद […]

Four women from the same family were raped
देश

धक्कादायक : प्रेमाच्या जाळ्यात ओढून एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार

राजस्थानमधील दौसा येथे अतिशय धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ढाब्याच्या मालकाने एकाच कुटुंबातील चार महिलांवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या आरोपीविरोधात पोलिसांनी बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दौसा येथे राहणाऱ्या या महिलांवर ढाबा चालक विष्णू गुर्जर याने बलात्कार केला. पीडित महिलेने पोलीस ठाणे गाठून त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांत तक्रार दाखल […]