मुंबई : मराठी पत्रकारितेत संपादक म्हणून प्रयोगशील राहिलेले आणि होतकरूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ पत्रकार, संपादक म्हणून सदा डुंबरे स्मरणात राहतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात, माध्यमांच्या क्षेत्रातील बदलांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून डुंबरे यांनी संपादक म्हणून प्रयोगशीलता जपली. त्यांनी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
आज देशभरातील व्यापाऱ्यांची भारत बंदची हाक, कोणत्या सेवांवर होणार परिणाम जाणून घ्या..
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती आणि वस्तू व सेवा कर (जीएसटी) मधील उणीवांचा विरोधात आज (26 फेब्रुवारी) देशभरातील व्यापाऱ्यांनी भारत बंदची घोषणा केली. सुमारे 8 कोटी छोटे व्यावसायिक भारत बंदमध्ये सामील होतील. तसेच देशातील जवळपास 1 कोटी वाहतूकदार आणि लघु उद्योग तसेच महिला उद्योजकही यात सहभागी असल्याचा दावा केला जात आहे. अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) 26 […]
IND vs ENG 3rd Test : भारताचा 10 गडी राखून दणदणीत विजय
IND vs ENG 3rd Test : तिसर्या कसोटी सामन्यात भारताने दुसर्या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन […]
1 मार्चपासून परिस्थितीनुसार गरज भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवाव्यात, शिक्षण विभागाचे निर्देश
कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. बऱ्याच ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या परिस्थितीनुसार स्थानिक प्रशासनाने 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च […]
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर आढळली स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ
मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळल्याने खळबळ उडाली आहे. या स्कॉर्पिओमध्ये जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तपास सुरु केला आहे. दरम्यान, या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याची देखील माहिती मिळत आहे. पोलीस आणि तपास […]
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण झाली आहे. उपचारासाठी त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रकाश आमटे यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी, असं त्यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी म्हटलं आहे. डॉ. प्रकाश आमटे यांना गेल्या ७ दिवसांपासून ताप आणि खोकला येत होता. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली. त्यांची RTPCR चाचणी […]
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी कमी केल्याने विरोधी पक्ष आक्रमक; फडणवीसांनी केला ‘हे’ गंभीर आरोप
मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत आज विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अर्थसंकल्पीय अधिवेशन १ ते १० मार्च या कालावधीत घेणार असा निर्णय झाला. बैठकीवर विरोधी पक्षाचे नेते पक्षनेते देवेंद्र फडणवीस निषेध नोंदवून बाहेर पडले त्यानंतर माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हटले कि जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काहीही देणेघेणे नाही. भ्रष्टाचार समोर येईल म्हणूनच हा पळपुटेपणा […]
ग्रामीण भागात घर बांधायचा विचार करताय? राज्य सरकारने घेतला अत्यंत महत्वाचा निर्णय
मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील सुमारे ३,२०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या भुखंडावरील बांधकामांना आता नगररचनाकाराच्या परवानगीची गरज लागणार नाही, अशी घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. सुमारे १,६०० चौरस फुटापर्यंतच्या (१५० चौरस मीटर) भुखंडावरील बांधकामासाठी ग्रामस्थास मालकी कागदपत्र, लेआऊट प्लॅन/मोजणी नकाशा, बिल्डींग प्लॅन आणि हे सर्व प्लॅन युनिफाईड डीसीआरनुसार असल्याचे परवानाधारक अभियंत्याचे प्रमाणपत्र आदी कागदपत्रे ग्रामपंचायतीस […]
आईने पंजाबी ड्रेस घातल्याचा राग अनावर होऊन अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या
सातारा : नागठाणे गावात राहणाऱ्या एका मुलाने किरकोळ कारणावरून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या मुलाच्या आईने साडी न नेसता पंजाबी ड्रेस घातला. पण यामुळे मुलाला प्रचंड राग आला. त्याने आईला पंजाबी ड्रेस घालू नको, साडी नेस असे सांगितले. परंतु आईने पंजाबी ड्रेसच घातला. यामुळे संताप अनावर होऊन या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन […]
ब्रेकिंग : सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता असणार करडी नजर, ‘या’ आहेत नवीन गाईडलाईन्स
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वेबसाइट्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ते म्हणाले की सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात तक्रारींचे निराकरण ठराविक वेळेत करण्यासाठी कंपन्यांना विशिष्ट यंत्रणा बनवावी लागेल. ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल आणि त्याचे नावही सांगावे लागेल. या अधिका्याला 15 दिवसांच्या आत […]










