High profile sex racket destroyed in Sangli
देश

हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, 23 जणांना अटक, पोलिसांच्या समावेशाने खळबळ

नोएडा : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका हॉटेलमध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या कारवाईत 12 महिलांसह 23 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात काही पोलिसांचा देखील समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ग्रेटर नोएडा येथील दनकौर परिसरातील चींती गावाजवळील एका हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना […]

centre writes to states to increase the interval between two doses of covishield vaccine
देश

बिग ब्रेकिंग : केंद्राकडून महत्वाच्या सूचना, कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढवा

नवी दिल्ली : भारतात पुन्हा कोरोना व्हायरसच्या संसर्गामध्ये वाढ होत असल्याने केंद्र सरकारने कोविशील्ड संदर्भात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले आहे. केंद्राने राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारांना कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्यास सांगितले आहे. एनटीजीआय आणि एनईजीव्हीएसीच्या शिफारशीनुसार या दोन डोसमधील अंतर 6-8 आठवडे करण्यास सांगितले आहे. नॅशनल टेक्निकल अ‍ॅडव्हायझरी ग्रुप आणि लस […]

Actor Karthik Aryan infected with corona
मनोरंजन

अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण

अभिनेता कार्तिक आर्यन याला कोरोनाची लागण झाली आहे. त्याने स्वतःच इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर केली आणि चाहत्यांना तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले.   View this post on Instagram   A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

Param Bir Singh moves SC seeking probe against Anil Deshmukh
महाराष्ट्र

ब्रेकिंग : परमबीर सिंह यांची अनिल देशमुख यांच्याविरोधात चौकशीसाठी सुप्रीम कोर्टात धाव

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांच्या चौकशीच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी व्हावी, अशी मागणी करणारी याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केली आहे. एकीकडे विरोधी पक्ष राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे, आता मुंबई पोलिसांचे माजी आयुक्त परमबीर सिंग […]

Navneet Rana's serious allegations against the Chief Minister
महाराष्ट्र

महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु, नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. याचे लोकसभेत देखील तीव्र पडसाद पडले आहेत. याप्रकरणी अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. खंडणी प्रकरणात मुख्यमंत्र्यांचाही हात असून त्यांच्या सांगण्यावरुनच हे सगळं सुरु आहे, असा आरोप नवनीत राणा यांनी लोकसभेत केला आहे. “महाराष्ट्रात […]

Uttarakhand Chief Minister Tirath Singh Rawat infected with corona
कोरोना देश

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण

देहरादून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत: ला विलगीकरणात ठेवले आहे. सीएम तीरथसिंग रावत यांनी स्वत: ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. तीरथसिंग रावत यांनी म्हटलं कि, “माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मी ठीक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली स्वत: ला आयसोलेट केले आहे. गेल्या काही दिवसात […]

India wins first Road Safety World Series
क्रीडा

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज

रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्स ने श्रीलंका लेजेंड्सचा १४ धावांनी पराभव केला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे विजेतेपद मिळवले. भारताने प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला १६७ धावा करता आल्या. अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय […]

Suspicion on allegations made by Parambir Singh against Anil Deshmukh
महाराष्ट्र

परमबीर सिंह यांनी नमूद केलेली ‘ती’ तारीख संशय निर्माण करणारी

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यात सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांची भेट घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, आता या आरोपांवरून संशय निर्माण होत आहे. सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांच्या भेटीची जी तारीख त्यांनी नमूद केली आहे, ती संशय निर्माण करणारी असल्याचं […]

aircraft hovering at the airport for an hour because the pilot could not land
देश

अहमदाबाद-जैसलमेर विमान तीन प्रयत्न करूनही लँड करता आले नाही, मग…

अहमदाबादहून निघून जैसलमेरला पोहोचलेल्या स्पाइसजेटच्या विमानाला तांत्रिक कारणांमुळे लँडिंग करता आले नाही. वैमानिकाने लँडिंगचे तीन वेळा प्रयत्न केले, परंतु तो अपयशी ठरला. सुमारे तासभर आकाशात फिरल्यानंतर विमान परत अहमदाबादला नेण्यात आले. या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरुन रडू लागले होते. स्पाइसजेटचे अहमदाबाद-जैसलमेर विमान नियमितपणे दुपारी 12.30 वाजता जैसलमेर विमानतळावर उतरते. शनिवारी 90 प्रवाश्यांची क्षमता असलेल्या या […]

I am not sure that there will be an impartial inquiry into this case in the state - Raj Thackeray
महाराष्ट्र

राज्यात ‘या’ प्रकरणाचा निष्पक्ष तपास होईल याची मला अजिबात खात्री नाही – राज ठाकरे

परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर भाजपाकडून देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता अंबानी यांच्या घराजवळ कुणाच्या सांगण्यावरून स्फोटकं ठेवण्यात आली हे समोर यायचं असेल, तर केंद्र सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]