aircraft hovering at the airport for an hour because the pilot could not land
देश

अहमदाबाद-जैसलमेर विमान तीन प्रयत्न करूनही लँड करता आले नाही, मग…

अहमदाबादहून निघून जैसलमेरला पोहोचलेल्या स्पाइसजेटच्या विमानाला तांत्रिक कारणांमुळे लँडिंग करता आले नाही. वैमानिकाने लँडिंगचे तीन वेळा प्रयत्न केले, परंतु तो अपयशी ठरला. सुमारे तासभर आकाशात फिरल्यानंतर विमान परत अहमदाबादला नेण्यात आले. या प्रकारामुळे अनेक प्रवासी घाबरुन रडू लागले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्पाइसजेटचे अहमदाबाद-जैसलमेर विमान नियमितपणे दुपारी 12.30 वाजता जैसलमेर विमानतळावर उतरते. शनिवारी 90 प्रवाश्यांची क्षमता असलेल्या या विमानात 44 प्रवासी होते. जेव्हा विमान जैसलमेरला पोहोचले तेव्हा वैमानिकाने लँडिंगसाठी पोझिशन घेतली, परंतु विमान थोडेसे खाली आणल्यानंतर त्याने ते अचानक पुन्हा उंचीवर नेले. काही तांत्रिक कारणास्तव लँडिंग करता येणार नाही, असे प्रवाशांना सांगण्यात आले, त्यामुळे बरेच प्रवासी घाबरून ओरडायला लागले होते.

यानंतर वैमानिकाने पुन्हा एकदा प्रयत्न केला. पण खाली येताच विमानाने पुन्हा उड्डाण केले. असे तीन वेळा घडले. सुमारे तासभर हे विमान आकाशात फिरत होते. यामुळे प्रवासी अतिशय घाबरुन गेले. अखेर हे विमान पुन्हा अहमदाबादकडे वळविण्यात आले.

विमान कंपनीने नंतर हेच विमान दुसर्‍या पायलटसह जैसलमेरला पाठवून त्याचे सुरक्षित लँडिंग केले. स्पाइसजेटच्या प्रवक्त्याने सांगितले की जैसलमेरमध्ये लँडिंग दरम्यान विमानाचा अप्रोच स्थिर नव्हता, त्यामुळे लँडिंग केलं नाही. विमान परत अहमदाबादला नेण्यात आलं. सायंकाळी ५ वाजून 22 मिनिटांनी हेच विमान सुरक्षितपणे जैसलमेर येथे उतरविण्यात आलं.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत