gas cylinders become more expensive from today

आजपासून गॅस सिलिंडर महागला, असे तपासा आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर

देश

वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी देशात स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढविले आहेत. आजपासून एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महाग झाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या नवीन किमती 2 डिसेंबरपासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर देशाच्या राजधानीत देशांतर्गत एलपीजीची किंमत 644 रुपयांवर गेली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

1 डिसेंबर रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅसचे दर वाढविले. 19 किलो सिलिंडरच्या दरामध्ये 55 रुपयांची वाढ करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, आजपासून एलपीजी सिलिंडर महाग झाला आहे. देशाच्या राजधानीत सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे, त्यानंतर दिल्लीकरांना आता या सिलिंडरसाठी 644 रुपये मोजावे लागणार आहेत.

गॅसची किंमत तपासण्यासाठी आपल्याला सरकारी तेल कंपनीच्या वेबसाइटवर जावे लागेल. येथील कंपन्या दरमहा नवीन दर जारी करतात. https://iocl.com/Products/IndaneGas.aspx या लिंकला भेट देऊन आपण आपल्या शहरातील गॅस सिलिंडर्सचे दर तपासू शकता.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत