Age 15 To 18 Will Be Able To Book Slots On The Kovin App Or Onsite
देश

मुलांच्या कोरोना लसीकरणासाठी आजपासून स्लॉट बुकिंग सुरू, जाणून घ्या नोंदणी प्रक्रिया

मुंबई : 3 जानेवारीपासून देशातील 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोनाची लस दिली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. यासाठी 1 जानेवारीपासून म्हणजेच नवीन वर्षापासून लसीकरण स्लॉटचे बुकिंग कोविन ऍपवर किंवा साइटवर करता येईल. लसीकरणाच्या स्लॉट बुकिंगसाठी 10वीचे ओळखपत्र देखील वैध असेल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, 15-18 वयोगटातील मुलांना फक्त भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस दिली जाईल. देशात या वयोगटाची संख्या सुमारे १० कोटी आहे. CoWIN प्लॅटफॉर्मचे प्रमुख डॉ. आर. एस. शर्मा म्हणाले की, नोंदणीसाठी 10वीचे ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. कारण काही विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड किंवा इतर कोणतेही ओळखपत्र नसण्याची शक्यता आहे. सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, 15-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी CoWIN व्यतिरिक्त, लस स्लॉटचे बुकिंग व्हेरिफायर/वॅक्सीनेटर द्वारे ऑन-साइट देखील केले जाऊ शकते.

मुलांची लसीकरण नोंदणी प्रक्रिया

  1. सर्वप्रथम आरोग्य सेतू अॅप किंवा Cowin.gov.in वेबसाइटवर जा.
  2. तुम्ही CoWIN वर नोंदणीकृत नसल्यास प्रथम नोंदणीचा ​​पर्याय निवडा.
  3. त्यानंतर नोंदणी पृष्ठ दिसेल. त्यावर तुम्हाला फोटो, आयडी प्रकार, नंबर आणि तुमचे पूर्ण नाव टाकावे लागेल. (येथे तुम्ही 10वी ओळखपत्र निवडू शकता). तसेच, येथे लिंग आणि वय प्रविष्ट करा.
  4. नोंदणी पूर्ण झाल्यावर, तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक पुष्टीकरण संदेश पाठवला जाईल.
  5. सदस्य नोंदणी केल्यानंतर, तुम्ही तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. यानंतर लसीकरण केंद्रांची यादी समोर येईल.
  6. आता तुमचा लसीचा स्लॉट तारीख, वेळेसह बुक करा आणि केंद्राला भेट देऊन लसीकरण करून घ्या.
  7. लसीकरण केंद्रात, तुम्हाला तुमचा ओळखीचा पुरावा आणि गुप्त कोड प्रदान करावा लागेल. जे तुम्ही नोंदणी केल्यावर तुम्हाला मिळेल.
  8. तुम्ही आधीच CoWIN वर नोंदणीकृत असाल तर साइन निवडा आणि तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर प्रविष्ट करा आणि गेट OTP वर क्लिक करा.
  9. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाका आणि Verify बटणावर क्लिक करा.
  10. आता तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाका आणि केंद्रानुसार तुमचा लसीचा स्लॉट बुक करा आणि लसीकरण करून घ्या.

आरोग्य सेतू अॅपद्वारे बुकिंग करत असल्यास
CoWIN टॅबवर जा आणि Vaccine टॅबवर क्लिक करा. नंतर proceed वर क्लिक करा आणि वर नमूद केल्याप्रमाणे लस स्लॉट बुक करा.
एका मोबाईल नंबरवरून जास्तीत जास्त चार लोकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत