ब्राझीलिया : ब्राझीलमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला असून तेथील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. जपानमधील फुकूशिमामध्ये झालेल्या अणुभट्टी अपघातासारखी परिस्थिती निर्माण झाली असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. मंगळवारी ब्राझीलमध्ये एकाच दिवसात ४१९५ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. ब्राझीलमधील पूर्वेकडील भागात कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पथकाचे नेतृत्व करणारे मिगुएल निकोलेलिस यांनी सांगितले की, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईतील जे. जे रुग्णालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनी लसीकरण करुन घेतलं आहे. ११ मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर आज गुरुवारी त्यांनी दुसरा डोस घेतला आहे. मुख्यमंत्री कार्यालयानं मुख्यमंत्र्यांचा लशीचा डोस घेतानाचा फोटो ट्वीट करत ही माहिती दिली आहे. […]
अक्षय कुमारने केला कंगनाला सीक्रेट कॉल, कंगनाने केला खुलासा
मुंबई : कंगना रनौत नेहमीच तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असते. कंगना नेहमीच बॉलिवूडमधील मूव्ही माफिया आणि घराणेशाहीच्या विरोधात आवाज उठवताना दिसते. नुकत्याच केलेल्या एका ट्वीटमध्ये कंगनानं अक्षय कुमारकडून तिला सीक्रेट कॉल आल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेल्या कंगनाच्या ‘थलायवी’चा ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक मोठ्या स्टार्सनी गुपचूप कॉल करून कौतुक केल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. कंगनानं अनेक गोष्टींचा […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी नियमानुसार कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यांनी स्वतःच ट्विट करत ही माहिती दिली. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतली. ते म्हणाले कि, “आज मी एम्समध्ये कोविड […]
राज्यात फेब्रुवारी पासून आतापर्यंत तीस पट रुग्णसंख्या वाढली, लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री म्हणाले…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी न डगमगता, सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहन आज केले. तसेच लॉकडाऊन किंवा निर्बंधांचे पाऊल कोरोना संसर्गाची लाट थोपवण्यासाठी उचलण्यात आले आहे. ते कुणा विरोधात नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनीही या लढ्यात शासनाला सहकार्य करावे. त्यांचे नुकसान होऊ नये अशीच भूमिका आहे. तसेच त्यांच्या मागण्या, सूचनांचा गांभीर्याने विचार करून […]
पुणे शहरातील सर्व दुकाने बंद, व्यापारी महासंघाने घेतला हा महत्वपूर्ण निर्णय..
पुणे : पुणे शहरातील सर्व दुकाने मंगळवारी, आजपासून बंद करण्याचा निर्णय पुणे व्यापारी महासंघाने घेतला आहे. त्या दरम्यान शहरातील सर्व व्यापारी महासंघाचे सदस्य असलेल्या व्यापारी संघटनांचे ४५ वर्षापुढील कामगार, व्यापारी, त्यांच्या कुटुंबीयांना लसीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारने आपले ‘ब्रेक द चेन’ आदेश जारी केल्यानंतर आता नंतर पुणे महापालिकेने सायंकाळी सर्व […]
आता घरबसल्या व्हॉट्सअपवरुन अशा पद्धतीने सिलेंडर बुक करा..
मुंबई : आजच्या काळात व्हॉट्सअॅपने आपले कार्य अधिक सुलभ केले आहे. बँकेचे स्टेटमेन्ट किंवा अन्य गोष्टी असो, आपल्या व्हॉट्सअॅपवर सहजपणे याबद्दल माहिती मिळते. आता व्हॉट्सअॅपवर एलपीजी सिलिंडरही बुक करता येणार आहे. जेणेकरून आपण घरी बसून काही मिनिटांतच सिलिंडर ऑर्डर करू शकाल. इंडेन आणि एचपी गॅस हे दोन्ही व्हॉट्सअॅपवरुन सिलिंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे तुम्ही […]
धक्कादायक! वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीवर सामुहिक बलात्कार
नगर : जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या वाघ्या-मुरळीला रस्त्यात अडवून मुरळीचे काम करणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना नगरजवळच्या आष्टी तालुक्यातील निबोंडी गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे. आष्टी तालुक्यातील ही महिला जागरण गोंधळात मुरळीचे काम करते. नगरला एका कार्यक्रमासाठी ती आपल्या सहकाऱ्यासह आली होती. येथील कार्यक्रम आटोपून ते […]
पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास, नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई : राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून ही घोषणा केली. राज्यातील लाखो विद्यार्थी- पालकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, इयत्ता नववी आणि अकरावीबाबतच्या निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या. […]
बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय घेतला मागे, अर्थमंत्र्यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली होती, पण तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी […]










