कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 11 एप्रिलला टास्क फोर्सची बैठक घेतली. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सर्वोच्च न्यायालयातील 50 टक्क्यांहून अधिक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह
नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाची स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत चालली आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन कोरोना रुग्णांची भर पडत आहे. अशातच आता सर्वोच्च न्यायालयाचे बहुतेक कर्मचारी आणि कारकून कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाचे 50 टक्के कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. अशा परिस्थितीत खबरदारी म्हणून सर्वोच्च न्यायालयातील सर्व […]
धक्कादायक : भटक्या कुत्र्यांनी स्मशानभूमीतील मृतदेह उकरून आणले रस्त्यावर
बुलढाणा : बुलढाण्यातील मलकापूर येथील सर्वधर्मीय स्मशानभूमीत दफन केलेले मृतदेह भटक्या कुत्र्यांकडून उकरुन काढले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हे कुत्रे दफन केलेले मृतदेह उकरुन ते रस्त्यावर आणत आहेत. अशा प्रकारे मृतदेहांची अवहेलना होत असल्याने संताप व्यक्त केला जात असून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करण्यात येत आहे. मलकापूर शहरात नदी काठावर माता महाकाली वॉर्ड […]
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रेमेडेसिव्हीरची निर्यात थांबवण्याचे निर्देश
नवी दिल्ली : देशात जोपर्यंत कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात मागील अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे देशातील अनेक ठिकाणी औषधांचा तुटवडा जाणवतो आहे. रेमेडेसिव्हीर हे औषध न […]
अवैध संबंधाच्या संशयातून पत्नीवर भररस्त्यात चाकूनं ४५ पेक्षाही जास्त वार, व्हिडीओ होतोय व्हायरल
नवी दिल्ली : दिल्लीत एका व्यक्तीने दिवसाढवळ्या आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी व्यक्तीनं अवैध संबंधाच्या संशयातून भररस्त्यात आपल्या पत्नीला अडवून चाकूने सपासप वार केले आहेत. यावेळी रस्त्यावर अनेकजण होते, पण आरोपीचा राग पाहता मृत महिलेच्या मदतीसाठी कोणीही पुढं सरसावलं नाही. दरम्यान आरोपीने पतिने आपल्या पत्नीची 45 पेक्षा अधिक वेळा […]
ब्रेक द चेन : जाणून घ्या आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे…
मुंबई : राज्य शासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत. या आदेशाच्या अनुषंगाने लोकांच्या मनातील शंकांचे निरसन करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने माहिती प्रसिद्ध केली आहे. १. डी मार्ट, रिलायंस, बिग बाजार सारखे मॉल्स उघडे राहणार का ? ४ आणि ५ एप्रिल रोजी राज्य शासनाने निर्बंधांबाबत आदेश काढले आहेत. जी […]
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला अभिवादनाचे कार्यक्रम साधेपणाने करण्याचे आवाहन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना साधेपणाने अभिवादन करण्याचे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार शासन स्तरावरही साजरी करण्यात येईल. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोठेही गर्दी न करता, घराघरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जावे, असे आवाहन मुंडे यांनी केले आहे. डॉ. बाबासाहेब […]
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठीच कडक निर्बंध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत असून या संकटाला सामोरे जायचे असेल, कोरोनाची साखळी तोडायची असेल तर कडक निर्बंध आवश्यकच आहेत पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या जीवन आणि कार्यशैलीत मोठे बदल करण्याची गरज आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली डायमंड असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. शासनाच्या […]
अनिल देशमुख आणि राज्य सरकारच्या अडचणीत वाढ, सुप्रीम कोर्टाने दिले CBI चौकशीचे आदेश
नवी दिल्ली : परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रानंतर खळबळ माजली होती. त्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशी टाळण्याचा प्रयत्न करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. यासोबत न्यायालयाने महाविकासआघाडी सरकारने केलेली याचिकाही फेटाळून लावली आहे. याप्रकरणात आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे आपली सीबीआय चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख […]
किरकोळ भांडणात तीन वर्षांच्या चिमुकलीने घेतली वडिलांची बाजू, आईने केली मुलीची हत्या
बंगळुरु : आई-वडिलांच्या टीव्हीच्या रिमोटवरुन झालेल्या भांडणात तीन वर्षांच्या चिमुकलीने जीव गमावला. मुलीने वडिलांची बाजू घेतल्यामुळे आईला राग अनावर झाला आणि तिने आपल्या तीन वर्षांच्या मुलीची गळा दाबून हत्या केली. कर्नाटकातील बंगळुरुमध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे. सुधा पश्चिम बंगळुरुतील टाईल्सच्या दुकानात हाऊसकीपिंग स्टाफ म्हणून कार्यरत होती. तर तिचा पती इरन्ना हा माथाडी कामगार आहे. […]









