मुंबई : कोरोना विषाणूवर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले कि, “कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढविण्यावर काम करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई : कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लॅन्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी असे सांगतांना लसीकरण वाढविण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव […]
कोकण हापूस आंब्याच्या नावाने होणारी फसवणूक थांबणार, कृषिमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश
मुंबई : आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. कृषि मंत्री यांच्या दौऱ्या दरम्यान इतर प्रकारचा आंबा हा “कोकण हापूस” म्हणून सगळीकडे विकला […]
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 14 एप्रिलला होणार चौकशी, CBI ने पाठवलं समन्स
सीबीआयकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर 14 एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, विमान प्रवाश्यांना आता 2 तासांपेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये मिळणार नाही ‘ही’ सुविधा
नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. त्यातच आता विमान प्रवाश्यांना यापुढे उड्डाणादरम्यान जेवण मिळणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, प्रवाश्यांना घरगुती उड्डाणादरम्यान २ तासापेक्षा कमी वेळेच्या उड्डाणांमध्ये खायला मिळणार नाही. विमान कंपन्या प्रवाशांना २ तास किंवा त्याहून अधिक प्रवासासाठी केटरिंग सुविधा देऊ […]
दीपिका पादुकोणने दिला MAMI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
दीपिका पादुकोणने मुंबई अॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती दीपिकाने सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली. तिने राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे. ती म्हणाली की सध्या मी आवश्यकतेनुसार लक्ष देऊ शकत नाही. 2019 मध्ये आमिर खानची पत्नी किरण राव यांच्या जागी दीपिकाला MAMI चे अध्यक्षपद देण्यात आले होते. दीपिकाने […]
ब्रेकिंग : केंद्र सरकारकडून रशियाच्या स्पुटनिक-व्ही कोरोना लसीला मंजुरी
केंद्र सरकारने रशियाच्या स्पुटनिक-व्ही या कोरोना प्रतिबंधक लसीला मंजूरी दिली आहे. या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी सोमवारी मंजुरी देण्यात आली. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन नंतर भारताने मंजूर केलेली ही तिसरी लस आहे. स्पुटनिक-व्ही ही लस रशियातील गॅमालेया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने विकसित केलेली आहे. And Sputnik V is approved. #covid #vaccine https://t.co/6CCX9oA0qJ — Teena Thacker […]
ब्रेकिंग : 10वी आणि 12वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षां गायकवाड यांनी दिली माहिती
दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे. सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तर ग्रामीण भागात इंटरनेटची […]
IPL 2021 : आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना
IPL २०२१ : IPL २०२१ चा सीझनमधील चौथा सामना पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. सामना आज रात्री ७.३० वाजता सुरू होईल. राजस्थान संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविना मैदानात उतरेल. कारण तो सध्या जखमी आहे. गेल्या मोसमात राजस्थानने दोन्ही सामन्यांमध्ये पंजाबचा पराभव केला होता. या पराभवाचा बदला पंजाबची टीम […]
अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या, पोलिसांनी १२ तासांतच केला गुन्ह्याचा उलगडा
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यातील बौंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ वर्षीय मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी कसून तपास करत १२ तासांतच आरोपीला अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी या मुलीच्या घरी ड्रायव्हरची नोकरी करत होता. त्याने मुलगी घरी एकटी असताना तिचे अपहरण केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या केली. […]










