Deepika Padukone Resigned As Chairperson Of MAMI
मनोरंजन

दीपिका पादुकोणने दिला MAMI च्या अध्यक्षपदाचा राजीनामा

दीपिका पादुकोणने मुंबई अ‍ॅकॅडमी ऑफ मूव्हिंग इमेज (MAMI) फिल्म फेस्टिव्हलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. ही माहिती दीपिकाने सोमवारी सोशल मीडियावर शेअर केली. तिने राजीनामा देण्याचे कारण सांगितले आहे. ती म्हणाली की सध्या मी आवश्यकतेनुसार लक्ष देऊ शकत नाही. 2019 मध्ये आमिर खानची पत्नी किरण राव यांच्या जागी दीपिकाला MAMI चे अध्यक्षपद देण्यात आले होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दीपिकाने काय म्हटले ?

दीपिकाने तिच्या निवेदनात लिहिले कि, MAMI च्या मंडळावर येऊन अध्यक्षपदावर काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध होता. एक कलाकार म्हणून, जगभरातील चित्रपट आणि कलागुण मुंबईत आणणं खूप उत्साहवर्धक होतं. मुंबई माझे दुसरे घर आहे. मला वाटते की माझ्या सध्याच्या कामांतील व्यस्थतेमुळे मी MAMI कडे आवश्यकतेनुसार लक्ष देण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास सक्षम नाही. MAMI चांगल्या हातात आहे हे जाणून मी MAMI पासून विभक्त होत आहे. अकादमीशी असणारं माझं नातं आणि बंध आयुष्यभर टिकतील.

Deepika Padukone Resigned As Chairperson Of MAMI
Deepika Padukone Resigned As Chairperson Of MAMI

 

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत