Action Will Be Taken If Other Mangoes Are Sold As Konkan Hapus
महाराष्ट्र मुंबई शेती

कोकण हापूस आंब्याच्या नावाने होणारी फसवणूक थांबणार, कृषिमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : आंबा हा शेतमाल ज्या राज्यातून व ज्या नावाने त्याची आवक होईल. त्याच नावाने त्याची विक्री करावी, परराज्यातून आंबा हा शेतमाल त्या राज्याच्या व आंब्याच्या जातीने विक्री होत नसल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचे निर्देश कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कृषि मंत्री यांच्या दौऱ्‍या दरम्यान इतर प्रकारचा आंबा हा “कोकण हापूस” म्हणून सगळीकडे विकला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची व ग्राहकांची फसवणूक होत आहे, असे सिंधुदुर्गचे आमदार वैभव नाईक यांनी निदर्शनास आणून दिले होते. याबाबत कृषि मंत्री यांनी पणन मंत्री बाळासाहेब पाटील, यांच्याशी संवाद साधला.

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर याचा परिणाम होत असून ग्राहकांची यात मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पणन मंत्री यांच्या सुचनेनूसार कृषि उत्पन्न बाजार समिती, मुंबई यांनी दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी परिपत्रक जारी केले आहे. याबाबतची दक्षता घेण्यात यावी व अशाप्रकारे तक्रार प्राप्त झाल्यास संबंधितांवर महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ नियम १९६७ व त्याखालील उपविधीतील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत