10th and 12th state board exams postponed

ब्रेकिंग : 10वी आणि 12वी च्या परीक्षा पुढे ढकलल्या, वर्षां गायकवाड यांनी दिली माहिती

महाराष्ट्र शैक्षणिक

दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. आता बारावीची परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा जून महिन्यात होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सध्याच्या स्थितीत ऑफलाईन परीक्षा घेतल्यास कोरोना संसर्गाचा धोका आहे. परीक्षा ऑनलाईन घेतल्या तर ग्रामीण भागात इंटरनेटची पुरेशी सुविधा नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड होईल. अखेर परीक्षा पुढे ढकलण्याखेरीज दुसरा पर्याय नाही, असा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडियावर व्हीडिओ रिलीज करून हा निर्णय जाहीर केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत