Litchi Seed Was Stuck In girls Throat Doctor Said Get Corona Test Done Girl Died
देश

संतापजनक : मुलीच्या घशात अडकले होते लिचीचे बी, डॉक्टर म्हणाले, कोरोना रिपोर्ट आणा, पण तोपर्यंत…

बिहार : डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळे एका ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या मुलीच्या घशात लिचीचे बी अडकले होते, त्यामुळे मुलीचे वडील तात्काळ तिला घेऊन रुग्णालयात आले. परंतु, डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील एका रुग्णालयात ही घटना घडली आहे. मृत मुलीचे वडिल म्हणाले […]

kanpur city kannauj girl child died due to suffocation in car after being locked inside
देश

हृदयद्रावक : चिमुकलीचा कारमध्ये गुदमरून मृत्यू, वडिलांनी दुसऱ्या दिवशी गाडीचा दरवाजा उघडला आणि…

उत्तर प्रदेश : कानपूरमधील कन्नोज येथे सोमवारी एक अतिशय हृदयद्रावक घटना घडली आहे. विजय कुमार यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा कारमध्ये अडकल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला. ही मुलगी कारमध्ये खेळायला गेली होती, परंतु, सेंटर लॉक सिस्टीममुळे तिला कारचा दरवाजा उघडता न आल्यामुळे ती आतमध्येच अडकून पडली. तिने रडून रडून आई-वडिलांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणालाही तिचा […]

sushant singh rajput
मनोरंजन

NCB ची मोठी कारवाई, सुशांतला ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर हरीश खानला अटक

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी तपास करत असलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) हाती त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचवणारा ड्रग पेडलर लागला आहे. हरीश खान नावाच्या या ड्रग पेडलरला एनसीबीने वांद्रेमधून अटक केली आहे. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 28 मे रोजी सुशांत सिंह राजपूतचा रूम पार्टनर आणि जवळचा मित्र सिद्धार्थ पीठानीला हैदराबादमधून अटक केली होती. एनसीबीने नीरज […]

Immoral relations should not mean that a woman is not a good mother - High Court
देश

अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई नाही, असा लावला जाऊ नये – उच्च न्यायालय

चंदीगड : एका याचिकेवर सुनावणी करताना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली आहे. पत्नी विवाहबाह्य संबंधांत असल्यानं आपल्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्यात येऊ नये, असा दावा पतीनं न्यायालयासमोर केला होता. यावर ‘अनैतिक संबंधांचा अर्थ महिला चांगली आई होऊ शकत नाही असा नाही’ अशी टिप्पणी उच्च न्यायालयाने केली आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च […]

milind soman share post how he quit smoking as he got addicted quickly
मनोरंजन

मिलिंद सोमण म्हणतो, मी आजपर्यंत केलेला सर्वात मोठा मूर्खपणा म्हणजे…

अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण त्याच्या फिटनेससाठी ओळखला जातो. सोशल मीडियावरून मिलिंद फिटनेस संदर्भातील अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांना फिटनेससाठी प्रोत्साहन देत असतो. आता मिलिंद सोमणने एक पोस्ट शेअर करत त्याच्या धुम्रपानाच्या सवयीबद्दल आणि त्यावर कसं नियंत्रण मिळवलं याबद्दल सांगितलं आहे. मिलिंद सोमणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत म्हटले की धुम्रपान करणं हा मी आजपर्यंत […]

hansal mehta pens emotional note as his father passes away
मनोरंजन

चित्रपट निर्माता हंसल मेहता यांच्या वडिलांचे निधन, हंसल मेहता झाले भावुक

मुंबई : चित्रपट निर्माता हंसल मेहता यांचे वडील दीपक सुबोध मेहता यांचे निधन झाले आहे. ही माहिती हंसल मेहता यांनी स्वत: सोशल मीडियाद्वारे दिली आहे. मात्र वडिलांच्या मृत्यूच्या कारणांबद्दल हंसल मेहता यांनी कोणतीही माहिती दिली नाही. हंसल यांनी आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला आणि त्यांनी आपल्या वडिलांसाठी हृदयस्पर्शी नोट देखील लिहिली आहे. हंसल मेहता […]

veteran tamasha artist kantabai satarkar daughter and grandson dies due to corona
महाराष्ट्र

ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांच्या कन्या आणि नातवाचे कोरोनाने निधन

अहमदनगर : काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनाने निधन झाल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबियांतील जवळपास 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. खेडकर कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. परंतु, आठ दिवसांत कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू […]

7 Killed, 7 Injured In Cylinder Blast In Gonda
देश

सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना, ७ ठार, ७ जण गंभीर जखमी

लखनौ : एका इमारतीत सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या या स्फोटात सात जणांना आपला जीव गमवावा लागला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ पुरुष, २ महिला आणि ३ लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर त्यांना लखनऊच्या ट्रामा […]

The ICC has given BCCI till June 28 to decide on the hosting of the T20 World Cup
क्रीडा

टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी ICC ने BCCI ला दिली २८ जूनपर्यंतची मुदत

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) २८ जूनपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ICC च्या मंगळवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीदरम्यान याविषयी निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात टी-२० विश्वचषक होणार आहे. मात्र भारतातील कोरोना स्थिती पाहता ही स्पर्धा UAE येथे खेळवण्यात येण्याची […]

Mi Tv 40 Horizon Edition Price And Specifications
गॅझेट्स देश

स्वस्त स्मार्ट टीव्ही : ४० इंचाचा Mi चा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच, जाणून घ्या किंमत व स्पेसिफिकेशन्स

पुणे : शाओमी कंपनीने ४० इंचाचा Mi TV 4A Horizon Edition हा स्वस्त स्मार्ट टीव्ही भारतात लाँच केला आहे. या टीव्हीचा सेल उद्या दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे.  हा स्मार्ट टीव्ही प्रीमियम बेजेल लेस डिझाइनमध्ये येणार आहे. फ्रेश लूक सोबत प्रीमियम मेटल बेजेल लेस डिझाइन सोबत आणले आहे. या स्मार्ट टीव्हीचा स्क्री टू बॉडी […]