ठाणे : भिवंडी शहरातील अवचित पाडा परिसरात असलेल्या भंगार गोदामांना मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एकूण 15 भंगार गोदामे जळून खाक झाली आहेत. या भंगार गोदामात कापड, चिंध्या, पुठ्ठे, प्लस्टिक, तागे, पीओपी आणि इतर भंगार साहित्य मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आले होते. या आगीचे नेमके कारण समजले नाही. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
सेक्स डॉल मार्गोला बॉडीबिल्डर युरीने दिला घटस्फोट, आता महिलेबरोबर डेट करण्यास तयार पण..
कझाकिस्तान : आपण जगभरात अशा अनेक बातम्या ऐकल्या असतील, ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण वाटते. अशीच एक घटना कझाकिस्तानमधून समोर आली आहे. वास्तविक, कझाकस्तानचा बॉडीबिल्डर युरी टोलोचको, ज्याने एका सेक्स डॉलशी लग्न केले होते, तो आता एखाद्या महिलेबरोबर डेट करण्यास तयार आहे, परंतु त्याने त्यासाठी एक अट ठेवली आहे. डेली रिपोर्टनुसार, युरी टोलोचको यांनी शुक्रवारी […]
तुम्ही किती हुशार आहात? हे सांगतो तुमच्या डोळ्यांतील बुबुळांचा आकार, प्रयोगातून झाले सिद्ध
एका नव्या अभ्यासातून समोर आले आहे की डोळे एकप्रकारे मेंदूची खिडकीच आहेत. आपले डोळे सांगतात की आपण किती हुशार आहात. डोळ्यांच्या केंद्रस्थानी असलेले डोळ्यातील बुबुळ यासाठी जबाबदार असते. डोळ्यांची बुबुळे केवळ प्रकाशावर प्रक्रिया करत नाहीत तर ते उत्साह, रुची आणि मानसिक थकवा याबद्दल देखील सांगतात. अमेरिकन अन्वेषण एजन्सी FBI गुन्हेगार खोटं बोलतोय की खरं हे […]
खत घोटाळा प्रकरण : खासदार अमरेंद्र धारि सिंह यांना अटक
दिल्ली : आरजेडीचे खासदार अमरेंद्र धारि सिंह यांना ED ने खत घोटाळ्याशी संबंधित पैशांच्या अफरातफरी प्रकरणात अटक केली आहे. त्यांना धन-शोधन निवारण अधिनियम कायद्याच्या (Prevention of Money Laundering Act -PMLA) कलमांतर्गत अटक केली आहे. हे प्रकरण इफ्को (IFFCO) आणि इंडिया पोटॅश लिमिटेड (आयपीएल) शी संबंधित खतांच्या घोटाळ्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये सीबीआयने गेल्या महिन्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा […]
अभिमानास्पद! रणजितसिंह डिसले यांची जागतिक बँकेचे शिक्षण विषयक सल्लागार म्हणून नियुक्ती
सोलापूर : ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींची जागतिक बँकेने शिक्षणविषयक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जून 2021 ते जून 2024 या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे. जागतिक बँकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत जगभरातील मुलांच्या शैक्षणिक संपादणूक […]
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन, सर्व प्रकारची दुकाने राहणार बंद
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊन आजपासून (3 जून) 9 जूनपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापने बंद राहणार आहेत. केवळ 11 वाजेपर्यंत घरपोच दुधाचा पर्याय देण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात […]
ते ट्विट मी केलं नाही, पण मला चांगला धडा मिळाला, ‘त्या’ आक्षेपार्ह ट्विटवर किशोरी पेडणेकर यांचं स्पष्टीकरण
मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर एका ट्विटमुळे वादात अडकल्या आहेत. ट्विटरवर लसींच्या ग्लोबल टेंडरसंबंधी प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याचा बाप काढल्याने किशोरी पेडणेकर सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. मात्र आता या संपूर्ण वादावर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्या म्हणाल्या की, ते ट्विट मी नाही तर एका शिवसैनिकाने केलं होतं. या शिवसैनिकाची हकालपट्टी करण्यात आल्याचंही […]
महिलेने पतीची हत्या करून मृतदेह किचनमध्ये पुरला, स्वतःच्या लहान मुलीसमोर केलं भयंकर कृत्य…
मुंबई : मुंबईत एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. महिलेने हत्या केल्यानंतर पतीचा मृतदेह किचनमध्येच पुरला होता. महिलेने हे भयंकर कृत्य तिच्या सहा वर्षाच्या मुलीच्या डोळ्यांसमोर केलं होतं. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव रईस शेख आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी शाहिदा शेख आणि तिचा प्रियकर अनिकेत उर्फ अमित मिश्रा याला अटक केली आहे. […]
भाजप नगरसेवकाची दहशतवाद्यांकडून घरात घुसून हत्या, माजी मुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त
श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील भाजपचे नगरसेवक राकेश पंडिता यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ते पुलवामा जिल्ह्यातील त्रालचे नगरसेवक होते. सुरक्षेशिवाय घरबाहेर न पडण्याचा इशारा पोलिसांनी त्यांना दिला होता. परंतु बुधवारी (2 जून) संध्याकाळी ते शेजाऱ्यांच्या घरात असतानाच दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केलं. या घटनेनंतर जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दु:ख व्यक्त करत दहशतवादी हल्ल्याचा […]
कौतुकास्पद! रिक्षात विसरलेले २ लाखाचे दागिने रिक्षाचालकाकडून परत, पोलिसांनी केले प्रामाणिकपणाचे कौतुक
मुंबई : कोरोना काळात अनेक जणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, रिक्षाचालकही याला अपवाद नाहीत. मात्र, अशा परिस्थितीत एका रिक्षाचालकाने माणुसकीचे दर्शन घडवून आणले आहे. रिक्षामध्ये एका महिला प्रवाशाचे दागिने आणि कपड्याने भरलेली बॅग विसरली होती. त्या रिक्षाचालकाने आपला प्रामाणिकपणा दाखवत महिलेचे दागिने आणि कपडे परत केले. रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत पोलीस इन्स्पेक्टर भारत चौधरी […]










