रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. लॉकडाऊन आजपासून (3 जून) 9 जूनपर्यंत असणार आहे. या कालावधीमध्ये सर्व प्रकारची दुकाने आणि आस्थापने बंद राहणार आहेत. केवळ 11 वाजेपर्यंत घरपोच दुधाचा पर्याय देण्यात आला आहे.
लॉकडाऊन काळात जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार असून जिल्हा प्रवेशासाठी ई पास अनिवार्य करण्यात आलेला आहे. शिवाय, एसटी, सरकारी आणि खासगी वाहतूक देखील या कालावधीमध्ये बंद राहणार असून केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी एसटी सेवा सुरू राहिल. तर, शेतकऱ्यांकरता आणि शेती संबंधित कामकाजाकरता बँका आणि वित्तीयसंस्था यांचं कामकाज 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. यावेळी बँकेत केवळ 10 टक्के कर्मचारी हजर राहतील. तर पेट्रोल पंप 5 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी सुरू राहणार आहेत. हायवेवरील पंप मात्र मालवाहतुकीसाठी 24 तास सुरू राहणार आहेत.
रत्नागिरीचे SP डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
#Ratnagiri#Waragainstvirus@RatnagiriPolice अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी कडक निर्बंधांचा अंमलबजावणीत सहकार्य करण्याचे आवाहन केले.@MahaDGIPR @DDSahyadri @abpmajhatv @zee24taasnews @ibnlokmattv1 @TV9Marathi @MiLOKMAT @DMRatnagiri @MahaPolice pic.twitter.com/MeNsXVGQQt
— DISTRICT INFORMATION OFFICE, RATNAGIRI (@InfoRatnagiri) June 2, 2021