Adulterated paneer and related items seized by FDA and police in Pune
पुणे महाराष्ट्र

पुण्यात मोठी कारवाई, तब्बल १४०० किलो भेसळयुक्त पनीर जप्त

पुणे : पुणे शहरात भेसळयुक्त पनीराची विक्री रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांच्या पथकाने मांजरी भागातील एका शेतातील गोदामावर छापा टाकून भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कारवाई केली. या कारवाईत १४०० किलो पनीर, १८०० किलो एसएमपी (स्प्रेडेबल मिल्क पावडर) पावडर आणि ७१८ लिटर पामतेल जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ११ लाख ५६ हजार रुपये आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मांजरी भागातील एका शेतातील गोदामात मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीरचा साठा करण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस कर्मचारी सचिन पवार, रमेश मेमाणे यांना मिळाली. यानंतर पोलिसांनी एफडीएच्या पथकाला घटनेची माहिती दिली. एफडीएच्या अधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने माणिकनगर परिसरातील गोदामावर छापा टाकला. या कारवाईत जप्त केलेल्या पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तर पंचासमक्ष भेसळयुक्त पनीर साठा नष्ट केला गेला.

एफडीएचे सहआयुक्त डॉ. राहुल खाडे आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली एफडीएचे अधिकारी आणि पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये एफडीएचे अधिकारी नारायण सरकटे, बालाजी शिंदे, अस्मिता गायकवाड, सुप्रिया जगताप, एल. डब्ल्यू. साळवे आणि पोलिसांचे पथक यांचा समावेश होता.

ही कारवाई भेसळयुक्त खाद्यपदार्थांच्या विक्रीवर कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली आहे, ग्राहकांचे आरोग्य रक्षण करण्याच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत