नवी दिल्ली : उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना मोफत लस मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 जून रोजी ही घोषणा केली होती. आता तुम्हाला शासकीय लसीकरण केंद्रावर मोफत लस मिळणार आहे. यासह आरोग्य मंत्रालयानेही लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्या उद्यापासून लागू होणार आहेत. राज्यांना आता कशाप्रकारे लस मिळेल? राज्यांना त्यांची लोकसंख्या, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
रागाच्या भरात तरुणाने बहिणीची गोळ्या घालून केली हत्या, कारण…
उत्तर प्रदेश : एका तरुणाने आपल्या बहिणीची गोळ्या घालून हत्या केल्याची घटना समोर आले आहे. मेरठ जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची बहिण तिच्या प्रियकराबरोबर पळून गेली होती, त्यामुळे तो खूप चिडलेला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मेरठमधील सरधना भागातील छूर गावात राहणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचे गौरव नावाच्या एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. […]
जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, अजित पवार यांनी दिला इशारा
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी माध्यमांना माहिती दिली की निर्बंध शिथील झाल्यानंतर फिरण्यासाठी जिल्ह्याबाहेर तसंच राज्याच्या बाहेर जाणाऱ्यांना जिल्ह्यात परत आल्यानंतर 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल, तसे आदेश काढावे लागतील, तज्ज्ञांनी तसा सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले की कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरीही […]
बापरे! कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य, AIIMS प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले…
नवी दिल्ली : भारतात येत्या सहा ते आठ आठवड्यांत कोरोनाची तिसरी लाट दाखल होऊ शकते. कोरोनाची तिसरी लाट रोखणं अशक्य असल्याचं मत ‘ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’चे (AIIMS) प्रमुख डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केले आहे. एम्सचे प्रमुख रणदीप गुलेरिया म्हणाले कि, “देशभरात अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे पुन्हा नागरिकांनी कोविडसंबंधी काळजी घेणं कमी […]
भीषण अपघात! ट्रकचालक करत होता ओरल सेक्स, एका महिलेचा मृत्यू तर…
अमेरिका : कॅलिफोर्निया राज्यातील सॅन जोस शहरात एका ट्रक चालकावर एका महिलेचा खून करून दोन जण गंभीर जखमी केल्याचा आरोप आहे. या ट्रकचा चालक ट्रकमध्ये एका २४ वर्षीय तरुणीसोबत ओरल सेक्स करत होता, त्यावेळी हा भीषण अपघात झाला. तसेच तो नशेत देखील होता. या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर […]
लिची खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या, ‘या’ समस्या होतील दूर…
अनेकांना लिची खायला आवडते. पण लिची खाण्याचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का? लिची खायला तर चवदार असतेच, त्याबरोबरच हे फळ पुष्कळ पोषक द्रव्यांनी देखील भरलेले असते. लिचीचे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यापासून वजन कमी करण्यापर्यंत अनेक फायदे आहेत. लिची खाण्याचे आणखी कोणते फायदे आहेत, ते जाणून घेऊया… फ्री रॅडिकल्स पेशींना नुकसान पोहोचवतात, ज्यामुळे शरीरावर वाईट परिणाम […]
पुण्यात पुन्हा वीकेंड लॉकडाऊन, असे असतील नवे नियम.. जाणून घ्या
पुणे : पुणे महापालिका हद्दीत पुन्हा एकदा वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे. याबाबत महापालिकेने आदेश जारी केले असून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात राहावा त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वीकेंड लॉकडाऊनमधून यावेळी अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना सूट देण्यात आली आहे. महापौर मुरलीधर मोहोळ […]
महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी सुरु करण्याचा निर्णय, ‘असे’ असतील नियम
सातारा : पर्यटकांसाठी राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी आजपासून (१९ जून) सुरु होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावर रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली जाईल. तर हॉटेल व्यावसायिक, कर्मचारी यांना प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. […]
महान युगाचा अंत! भारताचे महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन
चंडीगड : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारे पहिले भारतीय ॲथलिट आणि फ्लाईंग सिख अशी ओळख असलेले मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. ते ९१ वर्षांचे होते. कोरोना झाल्यामुळे मिल्खा सिंग यांना मोहालीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले. त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप […]
प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई शहरासह महानगर परिसराच्या दळणवळणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. हे प्रकल्प कालमर्यादेत पूर्ण करून नागरिकांना सुलभ आणि गतिमान परिवहन सेवा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री […]










