Union Ministers Son Ashish Mishra Arrested By Up Police In Lakhimpur Kheri Violence
देश

लखीमपूर खेरी हिंसा : अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक

लखीमपूर : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर १२ तासांच्या चौकशीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गंभीर आरोप आहेत. सर्वोच्च् न्यायालयाने दाखल घेतल्यानंतर याप्रकरणी तपासाला वेग आला. उत्तर प्रदेश पोलिसांकडून काल सकाळी ११ वाजल्यापासून मिश्रा याची चौकशी करण्यात […]

if you enjoy popping bubble wrap know the reason and benefits So pop away your stress
लाइफ स्टाइल

तुम्हालाही बबल रॅप फोडायला आवडते? मग ही माहिती नक्की वाचा…

जेव्हा एखादी नवीन वस्तू घरात येते तेव्हा अनेकजण त्याच्या पॅकिंगमध्ये वापरलेले बबल रॅप फेकत नाहीत. बहुतेक लोकांना ते फोडणे आवडते. याकडे अगदी कोणत्याही वयातील व्यक्ती आकर्षित होते. पण तुम्हाला माहित आहे का या मागचे कारण काय आहे? सर्व वयोगटातील लोक स्वतःला बबल रॅप फोडण्यापासून का थांबवू शकत नाहीत? चला तर यामागचे कारण जाणून घेऊ. तसेच […]

Chance of heavy rain with thunderstorms
महाराष्ट्र

राज्यात पुढील 3-4 तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, वादळी वारे वाहण्याची शक्यता

मुंबई : आज राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील 3-4 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील २-३ तासांत नाशिक, पुणे, अहमदनगर, धुळे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात […]

Byju’s hits pause on Shah Rukh Khan ads after son Aryan Khan’s arrest
देश

शाहरुख खानला मोठा झटका, BYJU’S ने थांबवल्या शाहरुखच्या सर्व जाहिराती

मुंबई : ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या केसचा परिणाम आता त्याचे वडील शाहरुख खानच्या व्यवसायावर होऊ लागला आहे. लर्निंग App BYJU’S ने शाहरुख खानच्या सर्व जाहिराती बंद केल्या आहेत. एवढेच नाही तर शाहरुखच्या प्री-बुकिंग जाहिरातीचे प्रकाशनही थांबवले आहे. शाहरुखच्या स्पॉन्सरशिप डील्सच्या व्यवहारांमध्ये BYJU’S हा सर्वात मोठा ब्रँड आहे. शाहरुखला या ब्रँडकडून वर्षाला 3 ते 4 कोटी […]

sindhudurg chipi airport inauguration today cm uddhav thackeray and narayan rane on stage
महाराष्ट्र

चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील आणि भाजप नेतेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे […]

rapecase
महाराष्ट्र मुंबई

ट्रेनमध्ये घुसलेल्या दरोडेखोरांकडून तरुणीवर बलात्कार, इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यानची घटना

कल्याण : इगतपुरी ते कसारा स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस ट्रेनमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात लोहमार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेसमध्ये शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दरोडेखोरांनी १५ त २० प्रवाशांची लूटमार केली आणि ट्रेनमध्ये असणार्‍या […]

Mantralaya Mumbai
महाराष्ट्र

कोविड रुग्णसेवेसाठी राज्यातील सर्व शासकीय व पालिका महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेसमवेत बैठक घेऊन त्यांच्या मागणीवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे दोन दिवसांतच वैद्यकीय शिक्षण विभागाने शासन निर्णय काढला. या निर्णयाप्रमाणे शासकीय व महापालिका वैद्यकीय महाविद्यालय, तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व निवासी डॉक्टरांना कोविड काळात त्यांनी बजावलेल्या रुग्ण सेवेसाठी ऋणनिर्देश म्हणून प्रत्येकाला १ […]

Mumbai Filmmaker Imtiaz Khatri Raided By Anti-Drugs Agency In Cruise Ship Drug Case
मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर एनसीबीचा छापा, आढळले ड्रग्स

मुंबई : चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या मुंबईच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर क्रूझ ड्रग्स प्रकरणाच्या संदर्भात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) छापे टाकले. याच प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत आणखी ७ जणांना अटक करण्यात आली होती. प्रोड्युसर इम्तियाज खत्रीच्या घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता 18 […]

Colleges, universities and tourist spots in Pune district will start from Monday
पुणे महाराष्ट्र

सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार, उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुणे : जिल्ह्यातील कोविड परिस्थितीत सुधारणा होत असून लसीकरणाचे प्रमाणदेखील चांगले असल्याने जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सोमवारपासून सुरू करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या कोविड आढावा बैठकीत ते बोलत होते. उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्ह्यातील कोविड परिस्थतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, जिल्ह्यात लसीकरणाला चांगली गती देण्यात आली आहे. लसीकरणात पुणे […]

Mumbai Court rejects bail applications of Aryan Khan
महाराष्ट्र मुंबई

आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, आर्थर रोड कारागृहात पाठवण्यात आले

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज आज मुंबईतील किल्ला कोर्टच्या दंडाधिकाऱ्यांनी फेटाळला आहे. त्यामुळे आर्यन खानचा अडचणीत आणखी वाढ झाली आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळले आहेत. याचा अर्थ आर्यन खानला सध्या तुरुंगात राहावे लागेल. कालची रात्र आर्यनसह इतर आरोपींनी तुरुंगाऐवजी एनसीबी कार्यालयात काढली. आज […]