Union Ministers Son Ashish Mishra Arrested By Up Police In Lakhimpur Kheri Violence

लखीमपूर खेरी हिंसा : अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक

देश

लखीमपूर : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला अखेर १२ तासांच्या चौकशीनंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केली आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशिष मिश्रा याच्यावर गंभीर आरोप आहेत. सर्वोच्च् न्यायालयाने दाखल घेतल्यानंतर याप्रकरणी तपासाला वेग आला. उत्तर प्रदेश पोलिसांकडून काल सकाळी ११ वाजल्यापासून मिश्रा याची चौकशी करण्यात येत होती. मात्र, चौकशीत सहकार्य करत नसल्याने पोलिसांनी आशिष मिश्रा याला अटक केली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

‘आरोपीची चौकशी करण्यात आली, परंतु, त्यात आरोपी सहकार्य करायला तयार नाही. पोलिसांच्या काही प्रश्नांना आरोपी प्रतिसाद देत नसल्याने व दाखल गुन्हा गंभीर असल्याने अटक करण्यात आली आहे’, असे लखीमपूर खेरी प्रकरणी नेमण्यात आलेल्या समितीचे प्रमुख पोलीस महानिरीक्षक उपेंद्र अग्रवाल यांनी सांगितले. आशिष याला उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

लखीमपूर खेरीतील घटना :

लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांना जीपखाली चिरडण्यात आले होते. ही जीप केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा चालवत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात आणखी चार जणांचा बळी गेला होता. दरम्यान, लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणात आशिष मिश्रा हा मुख्य आरोपी आहे. त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या कलम १४७, १४८, १४९ (दंगलीशी संबंधित कलमे), २७९ (बेदरकारपणे गाडी चालवणे), ३३८ (जीवाला धोका उत्पन्न होईल अशा पद्धतीने एखाद्याला इजा करणे), ३०४ अ, ३०२ (हत्या), आणि १२० ब ( गुन्हेगारी कट रचणे ) अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत