Colleges in the state will start from February 15

नवीन आदेश! पुण्यातील महाविद्यालये आता मंगळवारपासून सुरू होणार

पुणे महाराष्ट्र

पुणे : कोरोनाची लाट ओसरत असून राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सर्व बाजारपेठा, शॉपिंग मॉल, मंदिरं उघडण्यात आली आहेत. त्यानंतर पुण्यातही आता सोमवारपासून महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, आता सोमवारऐवजी मंगळवारीच महाविद्यालये सुरू होणार आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुण्यातील महाविद्यालय सोमवारी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, उत्तर प्रदेशमधील लखीमपूरमध्ये भाजपच्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या अंगावर जीप घालून चिरडून ठार मारले. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी 11 ऑक्टोबरला राज्य सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्यामुळे सोमवारी महाविद्यालये बंद राहणार आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबद्दल आदेश काढले असून मंगळवारपासून महाविद्यालये उघडली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक दिवस उशिराने महाविद्यालयात जाता येणार आहे.

दरम्यान, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कॉलेज कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ट्विट करत म्हटले कि, “ पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्येच लसीकरण केले जाईल. पीएमसी लवकरच पात्र विद्यार्थ्यांसाठी (18+ वर्षे) ज्यांचे अद्याप लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी विशेष ऑन-साइट लसीकरण मोहीम सुरू करणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत