if you enjoy popping bubble wrap know the reason and benefits So pop away your stress

तुम्हालाही बबल रॅप फोडायला आवडते? मग ही माहिती नक्की वाचा…

लाइफ स्टाइल

जेव्हा एखादी नवीन वस्तू घरात येते तेव्हा अनेकजण त्याच्या पॅकिंगमध्ये वापरलेले बबल रॅप फेकत नाहीत. बहुतेक लोकांना ते फोडणे आवडते. याकडे अगदी कोणत्याही वयातील व्यक्ती आकर्षित होते. पण तुम्हाला माहित आहे का या मागचे कारण काय आहे? सर्व वयोगटातील लोक स्वतःला बबल रॅप फोडण्यापासून का थांबवू शकत नाहीत? चला तर यामागचे कारण जाणून घेऊ. तसेच बबल रॅप फोडण्याचे फायदे देखील बघू.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एका संशोधनात असे आढळून आले आहे की, जेव्हा आपल्या हाती अशी कोणतीही स्पंज वस्तू येते, तेव्हा आपण स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि ती गोष्ट प्रेस करायला आणि फोडायला सुरुवात करतो.

तणाव दूर होण्यास मदत मिळते
जेव्हा आपण एखाद्या तणावाखाली असतो, तेव्हा अशा परिस्थितीत स्पंजी वस्तूंना धरून ठेवणे खूप दिलासादायक असते. त्याप्रमाणे वस्तू पॅक करणारा बबल रॅप फोडल्यामुळे तणावही दूर होतो. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन नुसार, बबल रॅप फोडणे तणावाची पातळी कमी करण्यास मदत करते. बबल रॅप फोडणारे लोक सामान्य लोकांपेक्षा अधिक सक्रिय आणि उत्साही असतात.

लक्ष केंद्रित केले जाऊ शकते
आपण एकदा बबल फोडायला सुरुवात केली, तर सतत तेच करत राहावे वाटते, ही चांगली गोष्ट आहे. असे केल्याने, तणाव दूर होण्याबरोबरच एका ठिकाणी लक्ष केंद्रित केले जाऊ शकते. जेव्हा अंगठा आणि पहिले बोट एकत्र जोडले जातात आणि बबल रॅप फोडण्याचा प्रयत्न केला जातो तेव्हा हे प्रत्यक्षात फायदेशीर असते. एका संशोधनात असे आढळून आले आहे की बबल रॅप इतके आकर्षक असते की ते कोणाचेही लक्ष वेधून घेते. म्हणूनच लोकांना ते फोडण्याची इच्छा होते.

मानसोपचारांसाठी चांगले
मानसोपचारतज्ज्ञ बबल रॅप एक उत्तम मेडिटेशन टूल म्हणून वापरू शकतात. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की 1 मिनिट बबल रॅप फोडल्यास तणावाची पातळी 33 टक्क्यांनी कमी होते. मानसोपचारांसाठी हे खूप चांगले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत