मुंबई : आज राज्यात अनेक भागांमध्ये गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर, पुणे आणि विदर्भात काही ठिकाणी पुढील 3-4 तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राच्या माहितीनुसार, पुढील २-३ तासांत नाशिक, पुणे, अहमदनगर, धुळे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता असून मध्यम ते तीव्र पाऊस पडू शकतो. गडगडाट होत असताना व विजा चमकत असताना बाहेर जाणे टाळा किंवा योग्य आसरा घ्या, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
9 Oct,Latest satellite obs at 3.20 pm: उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाडा भाग, पालघर पुणे आणी विदर्भ काही भाग, मध्यम ते तिव्र ढग दिसत असून पुढच्या 3,4 तासात या भागात गडहडाटासहीत ??☔☔?जोरदार पावसाची शक्यता….
ऑलरेडी अहमदनगर भागात पाउस… pic.twitter.com/rH7xCSEMEi— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 9, 2021




