पुणे : पायाच्या टाचेला होणाऱ्या सततच्या वेदना आजकाल अनेक लोकांसाठी सामान्य समस्या बनली आहे. विशेषतः वृद्ध व्यक्ती, दिवसभर उभे राहणारे कर्मचारी, खेळाडू आणि अनियमित पादत्राणे वापरणारे लोक यांना टाच दुखण्याची तक्रार सर्वात जास्त असते. अनेक स्त्रियांनाही ही समस्या सतावत असते. ही समस्या वेगाने वाढत असल्यामुळे तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, योग्य काळजी घेतली नाही तर यामुळे फूट पेन आणि क्रोनिक इन्फ्लेमेशनसुद्धा होऊ शकते.
टाच दुखण्याची प्रमुख कारणे
- टाच दुखण्यामागील कारणांमध्ये अनेकदा स्नायू, हाडे व सांधे मजबूत ठेवण्यासाठी आवश्यक पोषक घटकांची कमतरता असते. यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमची कमतरता किंवा प्रोटीनची कमतरता ही करणे असू शकतात. संतुलित आहार घेतल्यास टाच दुखण्यावर नियंत्रण ठेवता येते. यासाठी जेवणात दूध, चीज, दही, सोयाबीन, हरभरा, पालेभाज्या, बदाम, केळी, द्राक्षे, कडधान्ये यांचा समावेश करावा.
- प्लांटर फॅसाइटिस (Plantar Fasciitis):
टाचाखालील फॅशिया (स्नायूची पट्टी) जड किंवा चुकीच्या पद्धतीने चालल्यामुळे ताणल्यास वेदना होतात. हे सर्वात सामान्य कारण आहे. - जास्त वजन किंवा अचानक वजन वाढणे:
पायावर अतिरिक्त वजन येणे, टाचेला जास्त दबाव निर्माण करते आणि वेदना निर्माण होतात. - चुकीची किंवा जुनी पादत्राणे :
सपाट किंवा योग्य आधार न देणारी पादत्राणे टाचेला ताण देतात. - अत्यधिक चालणे किंवा धावणे:
दीर्घ काळ चालणे, उभे राहणे किंवा धावणे यामुळे टाच आणि पायातील स्नायूंवर जास्त दबाव येतो. - हिल स्पर्स (Heel Spurs):
टाचाच्या हाडावर सूक्ष्म कँस्ट्रक्शन, ज्याला हिल स्पर्स म्हणतात, यामुळे अचानक तीव्र वेदना होऊ शकते. - आर्थरायटिस आणि इतर आजार:
डायबिटीज, गाउट किंवा आर्थरायटिसमुळे टाच दुखणे सुरू होऊ शकते.
टाच दुखण्यावर घरगुती उपाय
- थंड पॅक लावा: वेदना असलेल्या भागावर 10–15 मिनिटे थंड पॅक लावल्यास सूज कमी होते.
- स्ट्रेचिंग एक्सरसाइज: पायाच्या बोटांचे स्ट्रेच, कॅल्फ स्ट्रेच आणि टाच स्ट्रेच करण्याने वेदना कमी होतात.
- योग्य बूट्स: सपोर्ट देणारी पादत्राणे वापरणे आणि टाचेला पॅडिंग असलेले इनसोल्स वापरणे.
- वजन नियंत्रण: जास्त वजन असल्यास कमी करून पायावर येणारा दबाव कमी करणे.
- आराम: सतत उभे राहणे किंवा चालण्यापासून काही काळ विश्रांती घेणे.
वैद्यकीय उपचार
घरगुती उपायांनी आराम न मिळाल्यास फिजिओथेरपी, स्टिरॉइड इंजेक्शन, Shockwave थेरपी किंवा गंभीर परिस्थितीत सर्जरीची गरज असू शकते. डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांचा सल्ला:
टाच दुखणे ही पायाच्या स्वास्थ्याची गंभीर लक्षणे दर्शवते. त्यामुळे योग्य पादत्राणे वापरणे, नियमित स्ट्रेचिंग, आणि वजन नियंत्रण करणे खूप महत्त्वाचे आहे.




