मुंबई : राज्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच पंजाब राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पंजाबचे कृषीमंत्री गुरुदीप सिंग यांच्याशी सिट्रस प्रणाली राज्यात राबविण्याविषयी सविस्तर चर्चा केली. मोसंबी फळाचे उत्पादन वाढविण्यासाठी पंजाबमधील तंत्रज्ञान राज्यात राबविणार असल्याचे भुमरे यांनी सांगितले. या दौऱ्यात फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ.कैलास मोटे, कृषी अधिकारी तुकाराम मोटे, फलोत्पादन शेतकरी श्री. नंदलाल […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मानधन तत्वावर अनुवादकांनी अर्ज करावेत, भाषा संचालनालयाकडून आवाहन
मुंबई : प्रशासकीय कायदे विषय शैक्षणिक, अभियांत्रिकी अशा विविध विषयातील इंग्रजी मजकुराचा मराठीत किंवा मराठी मजकुराचा इंग्रजीत अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांची नामिका तयार करावयाची आहे. त्यासाठी इंग्रजीतून मराठी व मराठीतून इंग्रजी अनुवाद करू शकणाऱ्या अनुवादकांकडून मराठी भाषा विभागाकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक अनुवादकांनी आपले अर्ज मूळ प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छाया प्रतीसह भाषा संचालनालय, नवीन प्रशासकीय […]
भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करण्याची कार्यपध्दत निश्चित
मुंबई : राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणांमध्ये मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना अवलंबवायची कार्यपध्दत निश्चित करण्यात आली आहे. याबाबत महसूल व वन विभागाने 6 ऑक्टोबर 2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रकरणी मोबदल्याच्या रकमेची परिगणना करताना गुणक घटक 1.00 राहील. महामार्ग प्रकल्पाकरिता भूसंपादन करताना एकसमान निकष […]
संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी, गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला आहे. हवामान खात्याकडून संपूर्ण महाराष्ट्राला येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच वीजा चमकत असताना बाहेर न पडण्याची विनंतीदेखील करण्यात आली आहे. हवामान खात्याने आज राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा दिला आहे. पुढील […]
Video : वन अधिकाऱ्यांसोबत आनंदाने चालणाऱ्या हत्तीच्या बाळाचा व्हिडिओ व्हायरल
तामिळनाडू : वन अधिकाऱ्यांसोबत आनंदाने चालणाऱ्या एका हत्तीच्या बाळाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. तामिळनाडूमध्ये वनविभागाच्या अधिकाऱ्यांना हत्तीचे एक पिल्लू एका खड्ड्यात पडलेले आढळले, त्यानंतर त्यांनी जखमी झालेल्या पिल्लावर उपचार केले. उपचार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला सुरक्षितपणे त्याच्या आईकडे परत नेले. भारतीय वन अधिकारी सुधा रामेन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओनुसार, हत्तीचे पिल्लू वन अधिकाऱ्यांसोबत […]
दिवसभर बसून काम केल्याने उद्भवतात अनेक समस्या, आहाराविषयी घ्या ‘अशी’ काळजी…
प्रत्येक काम वेगळे असते आणि प्रत्येकाला त्याच्या कामात वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. आजकाल अनेकांना बसून त्यांचे काम करावे लागते. त्यांना अनेक तास बसून राहावे लागते, त्यांनी त्यांच्या आरोग्याची अधिक काळजी घ्यायला हवी. अशा स्थितीत अनेकदा तुम्ही जागेवरून उठू शकत नाही. यामुळे, तुमची शारीरिक क्रिया खूप कमी होते. अशा परिस्थितीत, आपण आपल्या आहाराची विशेष काळजी […]
खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – अजित पवार
पुणे : देशाच्या मातीतला खेळ असलेल्या खो-खो खेळाला प्रोत्साहन मिळावे यासाठी कबड्डीच्या धर्तीवर स्पर्धा भरवून खो-खो खेळाला प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केले. महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे पीवायसी जिमखाना येथे आयोजित पुरस्कारार्थी खेळाडूंच्या गौरव कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार अनिकेत तटकरे, अभिमन्यू पवार, महाराष्ट्र खो-खो […]
महारक्तदान शिबीरातून उपलब्ध होणारे रक्त रुग्णांसाठी जीवनदायी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
ठाणे : राज्यात कोरोना काळात जाणवणाऱ्या रक्त टंचाईवर मात करण्याकरिता महारक्तदान शिबीरासारखे उपक्रम उपयुक्त ठरणार असून या माध्यमातून उपलब्ध होणारे रक्त गरजू रुग्णांना जीवनदान देईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाण्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून दसऱ्यापर्यंत महारक्तदान सप्ताहाचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री […]
Alert! गुगलने ‘या’ 136 धोकादायक ऍप्सवर घातली बंदी, तात्काळ करा डिलीट…
नवी दिल्ली : लोकांना सायबर फसवणुकीचा बळी बनवण्यासाठी हॅकर्स खूप सक्रिय झाले आहेत. यासाठी ते नवीन पद्धतींचा अवलंब करत असतात. लोकांनी याबाबत सावध राहण्याची गरज आहे. आता एक नवीन मालवेअर सापडला आहे. या मालवेअरने अँड्रॉइड वापरकर्त्यांचे आतापर्यंत लाखो डॉलर्स चोरले आहेत. झिम्पीरियमच्या (Zimperium) सुरक्षा तज्ञांनी याबद्दल माहिती दिली आहे. हे मालवेअर अॅप्स आपल्या फोनवर स्थापित […]
महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाचे योगदान मोलाचे – डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : महिलांच्या सक्षमीकरणामध्ये महिला धोरणाने महत्त्वाची भूमिका निभावली आहे. महिलांना समानतेचा दर्जा देण्यासाठी शासनाच्या या धोरणाचे खूप मोठे योगदान आहे. महिलांना विविध हक्क देण्याच्या अनुषंगाने या धोरणांनंतर सुरूवात झाली. 1994 मध्ये महिलांना संपत्तीमध्ये समान हक्क दिला गेला. प्रॉपर्टी कार्ड व इतर संपत्तीच्या कागदपत्रात महिलांची नावे पुरुषांच्या बरोबरीने आली. समान काम समान वेतन बरोबर रोजगार […]










