sindhudurg chipi airport inauguration today cm uddhav thackeray and narayan rane on stage
महाराष्ट्र

चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज संपन्न झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह महाविकास आघाडीतील आणि भाजप नेतेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उजव्या बाजूला केंद्रीय मंत्री नारायण राणे तर डाव्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार बसले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री ठाकरे आणि राणे यांनी सोबत दीपप्रज्वलन केलं. 2018 साली तत्कालीन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू आणि सिंधुदुर्गचे तत्कालीन पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या प्रयत्नाने सिंधुदुर्ग विमानतळाच्या धावपट्टीवर गणेशाची मूर्ती घेऊन विमानाचे टेस्ट लँन्डिंग झाले होते. त्यानंतर सुरेश प्रभूही विमानाने त्या धावपट्टीवर उतरले होते. पण त्यावेळी सिंधुदुर्ग विमानतळाचे काम पूर्ण नसल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाकडून विमानतळास परवानगी मिळाली नव्हती. आता विमानतळाचे काम पूर्ण झाल्याने डिजीसीएकडून सर्व परवानग्या मिळाल्याने विमानतळ उद्घाटनासाठी सज्ज झाले.

नारायण राणे यावेळी म्हणाले की, आज आनंदाचा क्षण आहे. अशा क्षणी कुठलंही राजकारण नको. आपण जावं, शुभेच्छा द्याव्या या हेतूने मी इथं आलो आहे. विमानं पाहिलं आणि खूप बरं वाटलं. देश विदेशातून पर्यटक सिंधुदुर्गात यावे आणि व्यवसाय वाढून आर्थिक समृद्धी व्हावी असं वाटतं. ते पुढे म्हणाले कि, “माझा जन्म सिंधुदुर्गातील आहे. मात्र मी मुंबईत आलो. मला बाळासाहेबांनी पुन्हा इकडं पाठवलं. मी आलो आणि निवडूनही आलो. इथं खूप समस्या होत्या मात्र मी बाळासाहेबांच्या प्रेरणेनं इथं विकासकामं केली. साहेबांच्या आशिर्वादाने मी मुख्यमंत्री झालो.”

आज सकाळी सिंधुदुर्ग विमानतळावर अलायन्स एअरच्या 70 सीटच्या पहिल्या विमानातून निमंत्रित मंडळी दाखल झाली. येत्या रविवारपासून प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नारायण राणे, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर, आ. वैभव नाईक, आ. नितेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत