मुंबई : मुंबईतील पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरला काही वेळापूर्वी भीषण आग लागली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहचले आहेत. शोरूम मधून स्फोटाचे आवाज येत असून शोरूम मध्ये कोट्यवधीच्या गाड्या असून त्या […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
प्रीती झिंटाच्या घरी पाळणा हलला, जुळ्या मुलांची आई झाली प्रीती झिंटा
बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेयर केली आहे. प्रीती झिंटा दोन जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रितीने तिच्या आयुष्यातील हा सर्वात आनंदाचा क्षण सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांसोबत शेअर केला आहे. पोस्टमध्ये प्रीतीने तिच्या दोन मुलांची नावेही चाहत्यांना सांगितली आहेत. प्रिती झिंटाने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिच्या पतीसोबतच्या फोटोसह एक खास नोट शेअर करून […]
सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांच्या किमान वेतनासाठी समिती गठित करणार – कामगार मंत्री हसन मुश्रीफ
मुंबई : कामगारांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असून सिमेंट उद्योग व सिमेंटवर आधारित उद्योगातील कामगारांना किमान वेतन असावे यासाठी समिती गठित करून यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. सिमेंट उद्योगातील ठेका श्रमिकांबाबत किमान वेतन समितीसमोर वेतन वाढीबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देशही कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. मंत्रालयात कामगार मंत्री मुश्रीफ यांच्या दालनात सिमेंट उद्योगातील […]
माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी ८ कोटी ५० लाख निधी वितरीत करण्यास मान्यता
मुंबई : माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 8 कोटी 50 लाख निधी वितरणास मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली. मुलींचा जन्मदर वाढविणे, लिंग निवडीस प्रतिबंध करणे, मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे, मुलींच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे यासाठी माझी कन्या भाग्यश्री ही […]
दिव्यांगाना साहित्य वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद – बच्चू कडू
जळगाव : मानवी सेवेत ताकद असल्याने समाजातील वंचित घटकांच्या मदतीसाठी प्रत्येकाने नेहमीच मदतीचा हात दिला पाहिजे. सामाजिक कार्याने प्रेरित संघटनेने दिव्यांग बांधवांना आवश्यक साहित्य वितरणाचा कार्यक्रम अनुकरणीय आणि कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा लाभक्षेत्र, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागास बहुजन कल्याण, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले. चाळीसगाव जि. जळगाव […]
मोठी बातमी! परमबीर सिंग फरार घोषित
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले आहे. परम बीर सिंग आणि अन्य दोघांना बुधवारी मुंबईतील न्यायालयाने फरार गुन्हेगार घोषित केले. सिंग यांच्यावर मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात हे प्रकरण आहे. मुंबईच्या किल्ला कोर्टाने त्यांना फरार घोषित केले आहे. गोरेगावच्या एका प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाने त्यांच्याविरोधात अनेक […]
दहावीच्या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख जाहीर, वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी बोर्ड परीक्षा २०२२ साठी दहावीच्या (SSC) परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची तारीख जाहीर केली आहे. शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवर वेळापत्रक शेअर केले आहे. त्या म्हणाल्या कि, “महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण […]
राज्यात जोरदार पावसाची शक्यता, आज ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी
मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पाच दिवस हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी […]
सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसे व गौरव वाढवणारे हवे
मुंबई : सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात उभारण्यात येत असलेलं स्मारक राजमातांच्या कार्यकर्तृत्वाला साजेसं आणि गौरव वाढवणारं असलं पाहिजे. अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिल्या. स्मारकाचं काम आकर्षक, दर्जेदार झालं पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच स्मारकासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाहीही उपमुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी […]
Video : पॅरासेलिंग करताना तुटली पॅराशूटची दोरी, ‘त्या’ दाम्पत्याचं पुढे काय झालं? जाणून घ्या…
दीव : दीवमध्ये पॅरासेलिंग करताना एका दाम्पत्याच्या पॅराशूटची दोरी तुटल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला होता. अजित काथड आणि त्यांची पत्नी सरला गुजरातच्या उना किनारपट्टीवर पॅरासेलिंग करण्यासाठी गेले असताना रविवारी ही घटना घडली होती. राईड करत असताना काही मिनिटांतच त्यांच्या पॅराशूटची पॉवरबोटला बांधलेली दोरी तुटली. त्यानंतर हे जोडपे थेट समुद्रात पडले. मात्र, सुदैवाने अजित किंवा त्यांची […]










