मुंबई : मुंबईतील पवई परिसरात असलेल्या साकी विहार रोडवर साई ऑटो ह्युंडाईच्या सर्व्हिस सेंटरला काही वेळापूर्वी भीषण आग लागली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, पवई पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि वाहतूक विभागाचे अधिकारी पोहचले आहेत.
शोरूम मधून स्फोटाचे आवाज येत असून शोरूम मध्ये कोट्यवधीच्या गाड्या असून त्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आगीत अद्याप किती नुकसान झालं, याची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचत असून परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.




