Greetings from Skill Development Minister Mangalprabhat Lodha on Engineer's Day
महाराष्ट्र

Engineer’s Day : अभियंता दिनानिमित्त कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या शुभेच्छा

मुंबई : देशभरात उद्या गुरुवार 15 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या अभियंता दिनानिमित्त राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. देशाच्या जडणघडणीत अभियंत्यांचे फार मोठे योगदान आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

भारतरत्न डॉ. एम. विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीदिनी देशभरात अभियंता दिन साजरा केला जातो. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून मंत्री लोढा म्हणाले की, आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांमध्ये देशाच्या जडणघडणीमध्ये अभियंत्यांनी फार मोठे योगदान दिले आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाच्या सर्वच पातळ्यांवर सर्वोच्चस्थानी नेण्याचा निर्धार केला आहे. देशाच्या या निर्माण कार्यात अभियंत्यांचे योगदान फार महत्त्वाचे असणार आहे. त्यादृष्टीने केंद्र आणि राज्य शासनामार्फत यापुढील काळातही अभियंत्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यात येईल. अभियंता दिनानिमित्त मी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे मंत्री लोढा यांनी सांगितले.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत