RBI Assistant recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे सहाय्यक पदभरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 950 जागांवर भरती होणार आहे. RBI ने या भरतीची तपशीलवार अधिसूचना देखील जारी केली आहे. अर्ज करण्याची लिंक आरबीआयच्या www.rbi.org या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 मार्च 2022 […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
बेपत्ता असलेली चिमुकली दोन वर्षांनी घरातच पायऱ्यांखाली सापडली, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण…
न्यूयॉर्क : न्यूयॉर्कमध्ये कस्टडी न मिळाल्यामुळे चार वर्षांच्या मुलीचे तिच्याच आई-वडिलांनी अपहरण केले आणि तिला दोन वर्षे घरात लपवून ठेवण्यात यश मिळवले, आता ही 6 वर्षांची मुलगी पोलिसांना सापडली आहे. 2019 सालापासून हरवलेली मुलगी न्यूयॉर्कमधील हडसन येथील तिच्या घराच्या पायऱ्यांखाली लपलेली आढळली. जवळपास दोन वर्षांपासून बेपत्ता असलेली मुलगी घरातील जिन्याखाली बांधलेल्या एका खास खोलीत सापडली. […]
भीषण दुर्घटना! विहिरीत पडून १३ जणांचा मृत्यू, हळदी समारंभावेळी झाले असे काही…
उत्तर प्रदेश : कुशीनगर जिल्ह्यातील नेबुआ नौरंगिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. एका हळदी समारंभासाठी मोठ्या संख्येने नातेवाईक जमले असतानाच विहिरीवरील जाळी तुटून अनेक जण त्यात कोसळले व त्यातील किमान १३ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त […]
16 फेब्रुवारी 2022 : मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय
पोहरा येथे शेळी समूह योजना राबविणार – अमरावती जिल्ह्यातील पोहरा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्रात शेळी समूह योजना राबविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या योजनेसाठी 7.81 कोटी इतका निधी देण्यात येईल. पोहरा प्रमाणेच राज्यातील उर्वरित 5 महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी समूह […]
आता चार वर्षांखालील मुलांना हेल्मेट घालणे आवश्यक, अन्यथा…
मुंबई : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लहान मुलांसाठी रस्ता सुरक्षेशी संबंधित नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार 9 महिने ते 4 वर्षे वयोगटातील मुलांसोबत दुचाकीवरून प्रवास करताना नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. अन्यथा दुचाकी चालकाला दंड भरावा लागू शकतो. रस्ते वाहतूक मंत्रालयाने 15 फेब्रुवारी 2022 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, लहान मुलांसोबत […]
हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीचा अहवाल खुला करुन सूचना मागवाव्यात – दादाजी भुसे
मुंबई : राज्यातील हळद पिकाच्या लागवड, प्रक्रिया व निर्यात यामधील समस्या व त्यावरील उपाययोजनांच्या अनुषंगाने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने तयार केलेला अहवाल खुला करुन यावर सूचना मागविण्यात याव्यात, असे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. आज मंत्रालयात हळद संशोधन व प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या अहवालाचे कृषीमंत्री यांच्या […]
गाजर खाण्याचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहित असायलाच हवे.. जाणून घ्या सर्व महत्वाच्या गोष्टी
पुणे : हिवाळ्यातील एक सुपरफूड म्हणजे गाजर. हिवाळ्यातील भाज्या निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आवश्यक आहेत. केशरी आणि रसाळ गाजर आपल्या आरोग्यासाठी, त्वचेसाठी आणि केसांसाठीही अनेक फायदे देतात. हे केवळ स्वादिष्टच नाही तर त्यामध्ये बीटा-कॅरोटीन, अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फायबर, व्हिटॅमिन के इत्यादीसारख्या अनेक महत्त्वाच्या पोषक तत्वांचा समावेश आहे. गाजर डोळ्यांचे आरोग्य सुधारतात, खराब कोलेस्ट्रॉल […]
दीप सिद्धूचा मृतदेह शवविच्छेदनानंतर देण्यात आला कुटुंबीयांच्या ताब्यात, लुधियानात होणार अंत्यसंस्कार
पंजाब : अभिनेता दीप सिद्धू याचा मंगळवारी रात्री अपघातात मृत्यू झाला. अपघातानंतर दीप सिद्धूचा मृतदेह सोनीपतच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आला होता. सोनीपत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दीप सिद्धूच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम पूर्ण झाले आहे. दीप सिद्धू याचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला असून, लुधियाना येथे त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. सोनीपाल पोलिसांनी दीप सिद्धूचे पोस्टमार्टम पूर्ण झाल्याची […]
तरुणांसाठी सुवर्णसंधी! टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीमध्ये विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी..
पुणे : टाटा एआयजी जनरल विमा कंपनी लिमिटेड हा टाटा समूह आणि अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप (AIG) यांच्यातील संयुक्त उपक्रम आहे. TATA समूह ही भारतातील एक प्रमुख संस्था आहे आणि AIG ही जगातील आघाडीची विमा आणि आर्थिक सेवा संस्था म्हणून ओळखली जाते. TATA General Insurance Company Limited ने 22 जानेवारी 2001 रोजी भारतात आपले कार्य सुरू […]
NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, ताब्यात घेतलेल्या आरोपीने केला अजब दावा…
नवी दिल्ली : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्या घरात एक संशयित घुसण्याचा प्रयत्न करत होता. अजित डोवल यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संशयित व्यक्तीला सुरक्षा दलांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. सुरक्षारक्षकांनी या संशयिताला पकडले. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकासोबत चौकशीदरम्यान त्याने अजब […]










