Singer-composer Bappi Lahiri dies in Mumbai hospital
मनोरंजन

ब्रेकिंग! ज्येष्ठ गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

मुंबई : गायक-संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. ते ६9 वर्षांचे होते. त्यांनी बुधवारी सकाळी मुंबईतील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील क्रिटी केअर या खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना पूर्ण बेड रेस्ट देण्यात आली होती. त्यामुळे हालचाल करण्यासाठी आणि सोयीसाठी त्यांच्या जुहू येथील […]

Controversy erupts in Mahavikas Aghadi over the post of Assembly Speaker
पुणे महाराष्ट्र

नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार – विजय वडेट्टीवार

मुंबई  : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निरा देवघर प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणार असल्याचे तसेच, नीरा देवघरमधील ज्या पात्र प्रकल्पग्रस्तांनी सन २००८ मध्ये ६५ टक्के रक्कम भरली आहे, त्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले. मंत्रालयातील दालनात नीरा देवघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. या बैठकीत […]

Agriculture Minister Dadaji Bhuse directed to plan for safe storage of fertilizer for Kharif and Rabi season 2022-23
महाराष्ट्र

खरीप व रब्बी हंगामाकरिता खताच्या संरक्षित साठ्यासंदर्भात नियोजन करावे, कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

मुंबई : खरीप व रब्बी हंगाम 2022-23 मध्ये शेतकऱ्यांना युरिया व डीएपी खताचा तुटवडा भासू नये, यासाठी केंद्र शासनाकडे याबाबत पाठपुरावा करुन नियोजन करावे, अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केल्या. आज मंत्रालयात युरिया व डीएपी खताच्या संरक्षित साठा (Buffer Stock) करुन ठेवण्याबाबत गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब […]

Nawab Malik
महाराष्ट्र

अल्पसंख्याक कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता मिळणार ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज

मुंबई : मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या शैक्षणिक कर्ज योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक कर्ज मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. आता एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ७ लाख ५० हजार रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज घेता येईल, अशी माहिती अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली. मंत्री मलिक म्हणाले, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बौद्ध, शीख, पारशी […]

Controversy erupts in Mahavikas Aghadi over the post of Assembly Speaker
महाराष्ट्र मुंबई

उच्च न्यायालयात एसबीसी घटकाची बाजू भक्कमपणे मांडू – विजय वडेट्टीवार

मुंबई : राज्यात विशेष मागास प्रवर्गाचे दोन टक्के आरक्षण संरक्षित करण्यासाठी शासन भक्कमपणे उच्च न्यायालयात एसबीसी घटकांची बाजू मांडेल त्यासाठी विशेष अभियोक्त्याची नियुक्ती करण्यात येईल, असे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मंत्रालयातील दालनात विशेष मागास प्रवर्गातील आरक्षणाबाबतच्या बैठकीत इतर मागास बहुजन कल्याणमंत्री श्री.वडेट्टीवार बोलत होते.यावेळी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अपर […]

Ajit Pawar's heartfelt tribute to CRPF jawan Ashok Ingwale
देश महाराष्ट्र

‘ती भेट आजही स्मरणात आहे’, ‘सीआरपीएफ’चे वीर जवान अशोक इंगवले यांना अजित पवार यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : पंजाबमध्ये कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या बारामती तालुक्यातील सोनगावचे सुपुत्र, ‘सीआरपीएफ’ जवान अशोक इंगवले यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. “तीन वर्षांपूर्वी १७ फेब्रुवारी २०१९ ला माझी आणि अशोकची भेट झाली होती. त्यावेळी त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांबद्दलच्या आठवणी सांगितल्या होत्या. त्याच्यासोबतची ती भेट आजही स्मरणात आहे. आज अशोकला वीरमरण आल्याचे […]

Decision to reduce syllabus so that students do not become stressed
महाराष्ट्र शैक्षणिक

विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षांना सामोरे जावे – वर्षा गायकवाड

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या परीक्षा प्रचलित पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टीने शाळा तेथे केंद्र किंवा उपकेंद्र या पद्धतीने नियोजन करण्यात आले असून इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्रांची/ उपकेंद्रांची संख्या 9613 तर इयत्ता दहावीसाठी परीक्षा केंद्रांची […]

9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र मुंबई

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ ते २५ मार्चदरम्यान मुंबईत

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे सन 2022 चे पहिले (अर्थसंकल्पीय अधिवेशन) मुंबईत गुरुवार दि. 3 मार्च 2022 रोजी सुरु होणार असून दि. 25 मार्च 2022 पर्यंत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

Relief to Ajit Pawar clean chit from election officials
महाराष्ट्र मुंबई

सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : आजच्या स्पर्धेच्या युगात खासगी, परदेशी आणि सहकारी बँकांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. या स्पर्धेत मॅको बँकेनेही टिकून राहिले पाहिजे. नागरिकांना आधुनिक सेवासुविधा पुरविल्या गेल्या पाहिजेत. सर्व बँकांच्या पदाधिकारी आणि सभासदांनी काम करीत असतांना जागरुक राहणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्राने संवेदनशीलता जपून सौजन्यपूर्ण सेवा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. दि महाराष्ट्र […]

Kerala 60 Year Old Daily Wage Labourer Super Glam Makeover Goes Viral After Photographer Make Him Model
देश

फोटोग्राफरने 60 वर्षीय मजुराला बनवले ग्लॅमरस मॉडेल

केरळ : लुंगी आणि शर्ट घातलेल्या 60 वर्षांच्या रोजंदारीवरील कामगाराने कल्पनाही केली नसेल की एक दिवस तो त्याच्या मॉडेलिंग टॅलेंटमुळे इंटरनेट जगतात चर्चेचा विषय बनेल. ममिक्का असे या मजुराचे नाव असून तो मूळचा केरळमधील कोझिकोड शहरातील आहे. एका छायाचित्रकाराने (shk_digital) या मजुराला त्याच्या प्रोजेक्टसाठी निवडले तेव्हा मम्मिकाचा सुपर ग्लॅमरस मेकओव्हर इंटरनेटवर आला. हा फोटोग्राफर शारिक […]