IPL २०२२ : इंडियन प्रीमियर लीगचा 15वा सीझन 26 मार्चपासून सुरू होणार आहे. 14 किंवा 15 मार्चपासून सर्व संघ आपला सराव सुरू करतील. मात्र, याआधी चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का बसला आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला गोलंदाज अष्टपैलू दीपक चहर आयपीएल 2022 च्या पहिल्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दीपक चहरला दुखापत झाली […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
नवी नियमावली! राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल, ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा
मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच […]
जागतिक महिला दिनानिमित्त ‘कशासाठी?- लिंगभाव समतेसाठी’ विषयावर अनुभव लेखनाचे आयोजन, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ‘हे’ आवाहन
मुंबई : समता हे आपल्या संविधानातील एक महत्त्वाचे मूल्य आहे. या दृष्टीने यंदाच्या जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने अनुभव लेखन हा उपक्रम आयोजित केला असून, त्याचा विषय ‘कशासाठी?- लिंगभाव समतेसाठी’ हा असून यात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि प्रधान सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले आहे. […]
दुर्दैवी! पुण्यात ड्रेनेज चेंबर साफ करताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू
पुणे : लोणी काळभोर येथील कदमवाक वस्तीमधील जय मल्हार कृपा सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करत असताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करण्यासाठी तीन कामगार चेंबरच्या आतमध्ये उतरले होते. श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या चौथ्या कामगाराचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस […]
वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचले, नंतर धगधगत्या सरणात उडी घेतली…
नागपूर : एका वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कुही तालुक्यातील किन्ही येथे मंगळवारी घडली. आत्माराम मोतीराम ठवकर(८०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे वडील होते. आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते वारकरी संप्रदायाचे होते. आत्माराम यांनी रात्रभर मंडईत नाटक बघितले. त्यानंतर मंगळवारी पहाटे […]
धक्कादायक! अल्पवयीन मुलीने आईला प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत बघितले, मग…
बिहार : बिहारमधील भागलपूर क्षेत्रातील कृपरामडीह शाहूनगर टोला येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी महत्त्वाचा खुलासा झाला आहे. अल्पवयीन मुलीची झोपेत निर्घृण हत्या करण्यात आली होती, दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा प्रेमप्रकरणाशी संबंध जोडून तपास करत होते. पोलीस तपासात खुनाची तार ऑनर किलिंगशी जोडलेली दिसत होती. मात्र आता पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला असून, त्यामुळे या हत्येचे […]
सोमनाथ गिते यांचा मा. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार
संगमनेर : व्यसनमुक्तीबाबत जनजागृती केल्याबद्दल संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सोमनाथ गिते यांचा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. गिते यांच्या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष साहाय्यक विभाग व यश मेडिकल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जामगाव येते झालेल्या व्यसनमुक्ती संमेलनात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार २०२२ देऊन […]
सोमनाथ गिते यांना २०२२ व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान
पुणे, ता.२३ : मागील काही वर्षांपासून व्यसनमुक्ती विषयावर लेखन करणाऱ्या सोमनाथ गिते यांना २०२२ चा व्यसनमुक्ती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. समुपदेशन, वर्तमानपत्रं, मासिकं, सोशल मीडिया आदी माध्यमांतून जनजागृती करत समाजात व्यसनमुक्ती चळवळीचे कार्य करण्याचे काम गिते यांनी केले आहे. या कार्याची दखल घेत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व यश मेडिकल फाऊंडेशनच्या […]
मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ
मुंबई : अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती (फ्रीशिप) योजनेसाठी अर्ज करण्यास व मागील वर्षीच्या अर्जाचे नूतनीकरण करण्यास यावर्षीच्या प्रक्रियेत सहाव्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज करता येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. महाडीबीटी पोर्टलद्वारे या दोनही योजनांसाठी […]
१२ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत, राज्यात सर्व जिल्ह्यांत व तालुक्यात आयोजन
मुंबई : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदीअंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. राष्ट्रीय लोकअदालत 12 मार्च 2022 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे […]










