The boyfriend threw petrol on his girlfriend and set her on fire
नागपूर महाराष्ट्र

वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचले, नंतर धगधगत्या सरणात उडी घेतली…

नागपूर : एका वृद्ध व्यक्तीने स्वतःचे सरण रचून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना कुही तालुक्यातील किन्ही येथे मंगळवारी घडली. आत्माराम मोतीराम ठवकर(८०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते येथील भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे वडील होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

आत्माराम ठवकर सधन कुटुंबातील असून ते वारकरी संप्रदायाचे होते. आत्माराम यांनी रात्रभर मंडईत नाटक बघितले. त्यानंतर मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ते शेताकडे गेले. शेतात असलेली लाकडं एकत्र करुन त्यांनी शेतात असलेल्या गॅस गोडाऊनच्या शेजारी सरण रचले व त्यावर सुकं गवत टाकलं. आत्महत्येपूर्वी त्यांनी सरणाजवळ पूजाही केली. त्यानंतर त्यांनी पेटत्या चितेत उडी घेतली, असा संशय आहे. सकाळच्या सुमारास तिथे त्यांची चप्पल आढळली आणि त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुलासह नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली आणि वेलतूर पोलीस ठाण्यात झालेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा केला, यावेळी सरणावर अर्धवट मृतदेह व शेजारी पेटलेला दिवा आढळला. वेलतूर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. २००६ मध्ये त्यांच्या श्वसनलिकेवर शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यांना अजूनही त्याचा त्रास होत होता. मात्र, त्यांनी आत्महत्या का केली याबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत