पुणे : लोणी काळभोर येथील कदमवाक वस्तीमधील जय मल्हार कृपा सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करत असताना चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सोसायटीच्या ड्रेनेज लाइनचे काम करण्यासाठी तीन कामगार चेंबरच्या आतमध्ये उतरले होते. श्वास गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. त्यांना मदत करण्यासाठी गेलेल्या चौथ्या कामगाराचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस व अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी चारही मृतदेह चेंबरमधून बाहेर काढले.
मृत कामगारांची नावे :
- सिकंदर पोपट कसबे
- पद्माकर मारुती वाघमारे
- कृष्णा दत्ता जाधव
- रुपेश कांबळे




