नवी दिल्ली : माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने (MIB) शिख्स फॉर जस्टिस (SFJ) या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित ऍप्स, वेबसाइट्स आणि सोशल मीडिया खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. विचाराधीन चॅनल परदेशी आधारित “पंजाब पॉलिटिक्स टीव्ही” आहे, ज्याचा SFJ शी संबंध असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. एका अधिकृत निवेदनानुसार, चॅनलने गुप्तचर माहितीच्या आधारे 5 राज्यांमध्ये सुरू असलेल्या विधानसभा […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
शिक्षकाने पार केली निर्लज्जपणाची सीमा, दहावीच्या विद्यार्थिनीसमोर ठेवली अश्लील अट…
राजस्थान : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील लालसोट पोलीस स्टेशन परिसरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे एका शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी दिली आणि तिच्यासमोर अश्लील अट ठेवत म्हणाला की, तू मला खुश कर, मग मी तुला चांगले गुण देईन. जर माझे ऐकले नाही तर मी तुला नापास करेन. यानंतर मुलीने धाडस करून हा प्रकार […]
एकाच कुटुंबातील 5 जणांचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
धुळे : धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेतून सर्व जण बचावले असून डायमंड वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अवधान परिसरात सोमवारी रात्री १० च्या सुमारास कौटुंबिक कलहांना कंटाळून […]
वाहन दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू, मृतदेहांची अवस्था बघता घटनास्थळीच करणार शवविच्छेदन
उत्तराखंड : उत्तराखंडमध्ये सोमवारी रात्री अतिशय मोठी दुर्घटना घडली आहे. टनकपूर-चंपावत महामार्गाला जोडलेल्या सुखीधांग-डांडामीनार रस्त्यावर भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मॅक्स या गाडीमध्ये बसलेले सर्व लोक टनकपूरच्या पंचमुखी धर्मशाळेत झालेल्या लग्नात सहभागी होऊन घरी परतत होते. मात्र, काल रात्री 3.20 च्या सुमारास मॅक्स गाडी अनियंत्रितपणे खोल दरीत कोसळली. दरम्यान, स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, पहाटे वाहन चालकाचा […]
नोकरीची संधी! भारतीय नौदलात 1531 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी
भारतीय नौदल भर्ती २०२२ : भारतीय नौदलाने ट्रेडसमन (Skilled) च्या 1531 पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भारतीय नौदलाच्या भरतीसाठी उमेदवार बुधवारपासून (२३ फेब्रुवारी) अर्ज करू शकतील. भारतीय नौदलाच्या या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार भारतीय नौदलाच्या www.joinindiannavy.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतील. नौदलाच्या या भरतीतून एकूण 1531 रिक्त जागा भरल्या जाणार […]
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर भीषण अपघात; ट्रेलरची एकापाठोपाठ ४ कारना धडक.. असा झाला अपघात..
खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील मुंबईकडील मार्गिकेवर ट्रेलरने चार कारना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर खोपोलीजवळ हा भीषण अपघात झाला. ट्रेलर चालकाचे नियंत्रण सुटले. अनियंत्रित ट्रेलरने मुंबईच्या दिशेकडील मार्गिकेवर एका कारला धडक दिली. […]
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा
मुंबई : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यात सात कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टांमध्ये सुधारणा केल्यानंतर राज्यात 25 लाख 05 हजार 300 अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांना तर 5 कोटी 92 लाख 16 हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थींना सवलतीच्या दरात अन्नधान्य योजनेचा लाभ मिळणार आहे. अशी माहिती अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक हक्क […]
रोहित शर्मा आता कसोटीचाही कर्णधार, पुजारा आणि अजिंक्य रहाणेला कसोटी संघात स्थान नाही
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) शनिवारी श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली. रोहित शर्माकडे कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली आहे, तर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांना टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. सलामीवीर केएल राहुल दुखापतीमुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर आहे. जसप्रीत बुमराह दोन्ही संघाचा उपकर्णधार असेल. मोठी बातमी म्हणजे […]
नांदेडच्या विकासासाठी राज्य शासनाकडून ८०० कोटींचा भरीव निधी – पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड : नांदेड महानगराच्या विकासाला ज्या मोठ्या निधीची अत्यावश्यकता होती तो निधी तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी दहा वर्षांपूर्वी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून अनेक विकास कामे करता आली. आज तब्बल 10 ते 12 वर्षानंतरचा काळ लोटल्यानंतर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महाराष्ट्र शासनाकडून सुमारे 800 कोटी रुपयांचा निधी नांदेड महानगराच्या विकासासाठी उपलब्ध करून […]
बायकोने ऑम्लेट बनवून दिले नाही, दारूच्या नशेत नवऱ्याने केले भयंकर कृत्य…
बिहार : बिहारमधील सीतामढी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीचा गळा दाबून तिचा मृतदेह छताच्या हुकला लटकवला. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला ऑम्लेट बनवण्यास सांगितले पण जेव्हा तिने ऑम्लेट बनवण्यास नकार दिला तेव्हा त्याने हे भयंकर कृत्य केले. आरोपीचे नाव अजित सिंह असून, तो निवृत्त उपनिरीक्षक (Retired sub inspector) राम […]










