रिलायन्स जिओने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढीनंतर अनेक बदल केले आहेत. ग्राहकांना खूश ठेवण्यासाठी, जिओने एक योजना आणली आहे ज्यामध्ये तुम्ही अमर्यादित इंटरनेट वापरू शकता आणि कॉल करू शकता. तुम्हाला हवा तितका डेटा वापरायचा असेल, तर Jio चा हा प्लान तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्ही एका दिवसात कितीही डेटा वापरू शकता. म्हणजेच, दररोज […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ज्येष्ठ अभिनेते कलातपस्वी राजेश यांचे निधन
बेंगळुरू : ज्येष्ठ कन्नड अभिनेते ‘कलातपस्वी’ राजेश यांचे आज बेंगळुरू येथे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांना 9 फेब्रुवारीला श्वसनाचा त्रास आणि वयोमानाशी संबंधित आजारांमुळे बंगळुरू येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात असलेल्या राजेश यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, आज (19 फेब्रुवारी) सकाळी त्यांची प्रकृती खालावली. ज्येष्ठ […]
किल्ले प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
सातारा : महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत किल्ले प्रतापगड ता. महाबळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. किल्ले प्रतापगडावर आई भवानी मातेची आज सकाळी श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते अभिषेक व पूजा करण्यात आली. भवानी मातेच्या मंदिरासमोरील ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या ह्रस्ते विधिवत पूजन करुन भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण ॲड. […]
मतदानानंतर बोटावर लावल्या जाणाऱ्या शाईची किंमत माहितेय? जाणून घ्या काही आश्चर्यजनक गोष्टी…
निवडणुकीची शाई : मतदान केल्यानंतर बोटांवर लावली जाणारी शाई किती काळ टिकते? ती कुठे तयार होते? आणि निवडणुकीच्या शाईचा प्रवास कुठून सुरू झाला? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतील. आज आपण या शाईविषयी जाणून घेऊयात… सुरुवातीला फक्त संसदीय आणि विधानसभा निवडणुकांसाठी शाई पुरवली जायची पण नंतरच्या काळात महापालिका आणि सहकारी संस्थांनाही निवडणुकांसाठी शाई पुरवण्याच्या येऊ […]
काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद, एक दहशतवादी ठार
काश्मीर : दक्षिण काश्मीरच्या शोपियानमध्ये शनिवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आपले दोन जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर या चकमकीत एक दहशतवादीही ठार झाला आहे. या परिसरात सुरक्षा दलाकडून शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या चकमकीत कॉन्स्टेबल संतोष यादव (1RR बटालियन) हे चकमकीत गोळी लागल्याने शहीद झाले. दुसरीकडे याच कारवाईत गोळी लागल्याने […]
ज्येष्ठ नेते अहमद हसन यांचे निधन
लखनौ : समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अहमद हुसेन यांचे आज लखनौ येथे निधन झाले. राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. तत्पूर्वी, 16 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेश विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान छातीत दुखू लागल्याने त्यांना KGMU च्या लॉरी कार्डिओलॉजी विभागात दाखल करण्यात आले होते, […]
नोकरीची संधी! रेल्वे व्यवस्थापन सेवा आणि CISF मध्ये बंपर भरती
Government Jobs : सरकारी नोकऱ्यांसाठी तयारी करणाऱ्या तरुणांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत तयारीला लागलेले तरुण प्रतीक्षा करत असतात अर्ज भरण्याची. काहीवेळा उमेदवारांना ते ज्या नोकरीची तयारी करत आहेत त्यासाठी त्यांचे अर्ज प्राप्त होतात आणि त्यांना त्याबद्दल नंतर कळते. CISF मध्ये क्रीडा कोट्यातून भरती CISF ने क्रीडा कोट्याअंतर्गत एकूण 15 खेळांच्या खेळाडूंसाठी अर्ज मागवले आहेत. […]
ज्येष्ठ पत्रकार रविश तिवारी यांचे निधन
ईटीचे माजी पत्रकार आणि प्रतिष्ठित राजकीय रिपोर्टर आणि संपादक रवीश तिवारी यांचे शनिवारी कर्करोगाशी लढा देताना निधन झाले. तिवारी यांनी इंडिया टुडेसह नामांकित वृत्तसंस्थांमध्ये काम केले होते आणि इंडियन एक्सप्रेसच्या राष्ट्रीय ब्युरोचे प्रमुख म्हणून काम करत होते. आयआयटी बॉम्बे मधून धातूविज्ञान आणि भौतिक शास्त्रात अभियांत्रिकी पदवीधर आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातून तुलनात्मक सामाजिक धोरणात पदव्युत्तर पदवीधर असलेले […]
Video : स्वतंत्रता सेनानी एक्सप्रेसला भीषण आग, मधुबनी रेल्वे स्थानकावरील घटना
बिहार : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्थानकावर एका ट्रेनला अचानक आग लागल्याची मोठी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दिल्लीहून येणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस गाडीला अचानक आग लागली. काही वेळातच ट्रेनने पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही ट्रेनला लागलेली आग किती भीषण होती, हे फोटो पाहून समजू शकते. सुदैवाने ट्रेन पूर्णपणे रिकामी होती. […]
राज्याच्या घराघरात, मनामनात शिवजयंतीचा आनंदोत्सव साजरा होऊ दे
मुंबई : “महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. महाराष्ट्र […]










