Crude oil prices rise, petrol-diesel prices rise Learn new rates.
देश

कच्च्या तेलाचे दर ४० डॉलरनी घसरले; भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा दिलासा

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या दरात अचानक वाढ झाली होती. सलग दोन आठवडे कच्च्या तेलाचे दर हे 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक होते. मात्र चालू आठवड्यात कच्च्या तेलाचे दर कमी झाले आहेत. कच्च्या तेलाचे दर 100 डॉलर प्रति बॅरलपेक्षाही कमी झाले आहेत. दरम्यान कच्च्या तेलाचे दर कमी झाल्याने भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा […]

Sonia Gandhi aggressively removed the state presidents of all the five states
देश राजकारण

५ राज्यांतील पराभवानंतर सोनिया गांधी आक्रमक, पाचही राज्याच्या प्रदेशाध्यक्षांना हटवले

नवी दिल्ली : गेल्या ५ राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन करण्याचा निर्णय घेतला असून पहिले महत्वाचे पाऊल म्हणून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या ५ राज्यांमधील प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला आहे. पक्षाचे जनरल सेक्रेटरी रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे. या पराभवानंतर काँग्रेसच्या कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत पराभवावर विचारमंथन करण्यात […]

sc big order every corona deceased family will have to pay compensation
देश

ब्रेकिंग! हिजाबचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयात, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान

Hijab controversy : शैक्षणिक संस्थांमधील हिजाब बंदीला आव्हान देणाऱ्या विविध याचिका फेटाळणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी हिजाब वादावर निर्णय दिला, हिजाब घालणे हा इस्लाममधील अत्यावश्यक धार्मिक प्रथेचा भाग नाही असे सांगून वर्गात हिजाब घालण्याची परवानगी देण्याविषयीचे मुस्लिम विद्यार्थिनींचे निवेदन न्यायालयाने नाकारले. राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर […]

Avoid 'these' mistakes about your smartphone
गॅझेट्स देश

मोबाईल चार्जिंगला लावून पत्नीशी बोलत असताना बसला विजेचा धक्का, तरुणाचा मृत्यू

इंदौर : इंदौरमध्ये एका व्यक्तीचा चार्जिंगला जोडलेल्या मोबाईल फोनवर बोलत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. ही घटना चंदन नगर पोलीस ठाण्यातील विक्रम हाइट्स येथे घडली. सुजीत विश्वकर्मा (वय २५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सुजीतचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार, सुजीत विश्वकर्मा मुंबईतील नालासोपारा येथील रहिवासी असून तो सुताराचे काम […]

Prabhas Fan Dies By Suicide After Radhe Shyam Gets Negative Reviews
मनोरंजन

अभिनेता प्रभासच्या चाहत्याची आत्महत्या, ‘राधे श्याम’ चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यामुळे टोकाचे पाऊल…

साऊथचा मेगास्टार प्रभास आणि पूजा हेगडे स्टारर चित्रपट ‘राधे श्याम’ 11 मार्च रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. रिलीजपूर्वी या चित्रपटाबाबत बरीच उत्सुकता असताना, टिळक नगर, आंध्र प्रदेश येथे मात्र एक अप्रिय घटना घडली आहे. वृत्तानुसार, प्रभासचा एक चाहता रवी तेजा याचा नुकताच मृत्यू झाला. प्रभासच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राधे श्याम चित्रपटाला नकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्यामुळे रवी […]

Nawab Malik
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नवाब मलिकांना मोठा झटका! ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात ईडीच्या कारवाईविरोधात केलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. ईडीने केलेली अटक कारवाई आणि त्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने सुनावलेला कोठडी आदेश बेकायदा असल्याचा दावा करत दाखल केलेल्या हेबियस कॉर्पस याचिकेतील अंतरिम सुटकेचा विनंती अर्ज न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे व न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने फेटाळला आहे. […]

Six killed in car-truck accident on Agra-Lucknow road
अहिल्यानगर महाराष्ट्र

बारावीचा पेपर देऊन घरी निघालेल्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू

अहमदनगर : बारावी परीक्षेचा पेपर देऊन दुचाकीवरून घरी निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत या दोघांचा जागीच मृत्यू झाला. नगर-जामखेड रस्त्यावर सोमवारी दुपारी ही दुर्दैवी घटना घडली. सागर बबन लष्करे (रा. गोरेगाव, ता. पारनेर) व किरण बाबासाहेब ठुबे (रा. कान्हूरपठार, ता. पारनेर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. बारावीचा पेपर देऊन पारनेर […]

man murdered by accused who wants to kill his daughter in law
पुणे महाराष्ट्र

पुण्यात घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांकडून अटक

पुणे : पुणे शहरामध्ये घरफोडी करणा-या आंतरराज्य टोळीस मार्केटयार्ड पोलीसांनी अटक केली आहे. मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये विविध कलम लावण्यात आलेले अनोळखी आरोपी सोनीया अपार्टमेंट, चाफळकर कॉलनी, मार्केटयार्ड, पुणे येथे घरफोडी करण्याचा प्रयत्न करीत असताना तेथे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी यातील आरोपीतांनी सोसायटीचे वॉचमन आणि पोलिसांच्या अंगावर त्यांच्या बॅगमधील दगड-विटा फेकुन मारल्या, […]

world coronavirus lockdown corona 6 crore covid active cases in world china battles worst covid 19 outbreak in 2 years
कोरोना देश

कोरोनाचा पुन्हा उद्रेक! अनेक शहरांत लॉकडाऊन, घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना, कोरोनाची चौथी लाट धडकणार?

जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा चीनमध्ये पुन्हा एकदा उद्रेक पहायला मिळत आहे. चीनमध्ये दररोज कोरोना बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चीनमधील अनेक भागांत पुन्हा लॉकडाऊन लावण्यास सुरुवात झाली आहे. कोट्यवधी नागरिक लॉकडाऊनमध्ये असून त्यांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या दैनंदिन वाढत्या रुग्णसंख्येमुळे सर्वांचीच चिंता वाढवली आहे. मंगळवारी, चीनमध्ये 5280 नवीन […]

Appeal to experts, women's organizations and NGOs for suggestions on amendments to the Shakti Act
महाराष्ट्र मुंबई

पोलीस दलाच्या बळकटीकरणावर भर, 7231 पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर देणार असल्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. पोलिस दलात भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 12 हजार 500 पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 7231 पदांसाठीची भरती प्रक्रिया लवकरच सुरू […]