मुंबई : जलसंपदा विभागामार्फत पुढील दोन वर्षात 104 प्रकल्प पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असून यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आला आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली. महसूल, वन, जलसंपदा, उद्योग, ऊर्जा व कामगार, ग्रामविकास, अन्न व नागरी पुरवठा आणि सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सन 2022-23 च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना पाटील […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
मुंबई लोकलमधील गर्दी जीवावर बेतली, लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू
मुंबई : आज (बुधवार) सकाळीच धावत्या लोकलमधून पडल्याने एका २२ वर्षाय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. सकाळी गोरेगाव ते मालाड स्थानकादरम्यान हा अपघात झाला असून बोरीवली रेल्वे पोलिस स्थानकात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. सकाळच्या सुमारास लोकलमधून चर्चगेटच्या दिशेने जाताना ही घटना घडली. लोकलमध्ये सकाळच्या सुमारास मोठी गर्दी असते. त्यात हा […]
भयंकर! आईनेच दोन महिन्यांच्या चिमुकलीला मारून ओव्हनमध्ये टाकलं…
नवी दिल्ली : देशाची राजधानी नवी दिल्लीत एक अतिशय भयंकर घटना घडली आहे. सोमवारी मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केली. तिने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ओव्हनमध्ये टाकला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन […]
मस्तच! स्वस्तात खरेदी करा OnePlus Nord 2 5G स्मार्टफोन, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स…
सध्या Amazon वर अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहेत. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर OnePlus Nord 2 5G हा एक चांगला पर्याय असू शकतो. 50MP ट्रिपल रियर कॅमेरा, AMOLED डिस्प्ले आणि 4500mAh बॅटरी असलेला हा फोन सध्या सवलतीत खरेदी करता येईल. तुम्ही हा फोन Amazon वरून EMI वर किंवा बँक डिस्काउंटसह […]
हिजाब वाद : न्यायाधीशांना धमक्या, व्हिडिओ पाठवून म्हणाले – सरन्यायाधीश मॉर्निंग वॉकसाठी कुठे जातात हे आम्हाला माहीत आहे…
हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या न्यायाधीशांना धमक्या येत आहेत. यामध्ये उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांचाही समावेश आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे वकील उमापती यांना सोशल मीडियावर एक व्हिडिओ मिळाला होता. त्यात म्हटले होते की सरन्यायाधीश मॉर्निंग वॉकसाठी कुठे जातात हे आम्हाला माहीत आहे. याबाबत वकिलाने कुलसचिवांना पत्र लिहून माहिती दिली. यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा […]
दरोडा टाकून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील हिरजे वस्तीवर दरोडा टाकून वृद्ध व्यक्तीचा खून केल्याप्रकरणी आतापर्यंत ६ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. याबाबत आज पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. या दरोडा प्रकरणात गुन्हेगारांचे धागे-दोरे मिळत नसल्याने पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. आता अखेर पोलिसांना या प्रकरणात मोठे यश मिळाले […]
शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांकडून जादा पैसे घेणाऱ्या खाजगी वाहकांवर कारवाई करणार
मुंबई, दि. 16 : शिमग्याच्या सणासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर कोकणाकडे रवाना होतात, दरम्यान कमी पडत असलेल्या एसटीच्या गाड्यांना पर्यायी एसटी बसगाड्या रत्नागिरीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. खाजगी बसवाहकांनी प्रवाश्यांकडून जादा पैसे आकारून लूट करीत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांनी दिली. कोकणाकडे जाणाऱ्या मुंबईकरांची खाजगी बसवाहक लूट […]
लोकशाहीला हॅक करण्यासाठी सोशल मीडियाचा गैरवापर केला जातोय – सोनिया गांधी
नवी दिल्ली : बुधवारी लोकसभेत बोलताना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, ‘आपल्या लोकशाहीला हॅक करण्यासाठी’ सोशल मीडियाचा गैरवापर केला जात आहे. फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भारतात राजकीय कथा मांडण्यासाठी फेरफार केला जात आहे. सोनिया गांधी म्हणाल्या कि, “फेसबुक आणि ट्विटर सारख्या जागतिक कंपन्यांचा वापर नेते, पक्ष आणि त्यांच्या प्रॉक्सीद्वारे राजकीय कथन […]
बलात्कार प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, कस्टडीतून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना…
गुवाहाटी : गुवाहाटीच्या बाहेरील भागात मंगळवारी रात्री बलात्काराच्या गुन्ह्यातील एका आरोपीला ठार मारण्यात आले, जेव्हा त्याने गुन्ह्याच्या घटनास्थळाच्या पुनर्बांधणीसाठी त्याच्यासोबत आलेल्या पोलिस पथकावर हल्ला करून कस्टडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. आरोपी बिकी अली (वय 20) याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याला गोळ्या घालण्यात आल्या. गुवाहाटी मेडिकल कॉलेज हॉस्पिटलचे अधीक्षक अभिजित सरमा म्हणाले की, “या […]
हायकमांडच्या आदेशाचे पालन! नवज्योतसिंग सिद्धू यांनी दिला पदाचा राजीनामा
पंजाब : पंजाबमध्ये काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर पक्षात बदलाची प्रक्रिया सुरू झाली आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले. सिद्धू यांनी काँग्रेस हायकमांडच्या आदेशाचे पालन केले आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी सोनिया गांधी यांनी नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह सर्व निवडणूक राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्यास सांगितले होते. […]










