नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी १० जून २०२२ रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मे आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह १५ राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण ५७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार सर्वश्री पियुष गोयल, पी. चिदंबरम, प्रफुल्ल पटेल, डॉ. विकास महात्मे, […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
चिमुकली आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर गेली… आणि नराधमाने डाव साधला…
मुंबई : आईस्क्रीम घेण्यासाठी घराबाहेर पडलेल्या आठ वर्षीय मुलीवर एका तरुणाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील आग्रीपाडा परिसरात शुक्रवारी घडली. आग्रीपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत आरोपीला अटक केली. 38 वर्षीय आरोपीचा अल्पवयीन मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा इतिहास असून यापूर्वीच त्याच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आग्रीपाडा परिसरात आजीसोबत राहणारी आठ वर्षांची पीडित मुलगी […]
जळगाव हादरले! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
जळगाव : 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच ते सहा जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील एका गावात […]
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाशी संबंधित गट-क संवर्गातील १०,१२७ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू
मुंबई : ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक, सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या 5 संवर्गातील एकूण 10 हजार 127 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या पाच संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 च्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त झालेले असून यासंदर्भातील भरती प्रक्रिया जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या जिल्हा निवड समितीमार्फत […]
अखेर अभिनेत्री केतकी चितळे पोलिसांच्या ताब्यात
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका करणारी अभिनेत्री केतकी चितळे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज सकाळीच ठाण्यात आणि त्यानंतर पुण्यात पोलिसांनी केतकी चितळे हिच्यावर गुन्हा नोंदवून घेतला होता. त्यानंतर ठाणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केतळी चितळे हिच्याविरोधात पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. ठाणे […]
NEET PG परीक्षा 2022 चे ऍडमिट कार्ड जारी, अशाप्रकारे करा डाउनलोड…
नवी दिल्ली : नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट (NEET) PG परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र शनिवार, 14 मे रोजी प्रसिद्ध झाले आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स (NBE) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर NEET PG 2022 प्रवेशपत्र जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी NEET PG 2022 परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यांना प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाइट nbe.edu.in आणि natboard.edu.in […]
मोठी बातमी! 3.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, उच्च न्यायालयाने दिले ‘हे’ आदेश
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नुकतेच बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडला 2020 च्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यातील 3.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. बजाज अलियान्झला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश देताना न्यायमूर्ती आरडी धानुका आणि एसजी […]
केंद्र सरकारने उचलले मोठे पाऊल, गव्हाच्या निर्यातीवर घातली तात्काळ बंदी
नवी दिल्ली : भारत सरकारने गव्हाच्या निर्यातीवर तात्काळ बंदी घातली आहे. त्याची निर्यात आता ‘बंदी घातलेल्या’ मालाच्या श्रेणीत टाकण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ हे यामागचे एक प्रमुख कारण आहे. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) शुक्रवारी संध्याकाळी एक अधिकृत अधिसूचना जारी करून सरकारच्या निर्णयाची माहिती दिली. तथापि, ज्या निर्यात ऑर्डरसाठी 13 मे […]
20 वर्षीय मॉडेल-अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, राहत्या घरी मृतावस्थेत आढळली
केरळ : केरळमधील कोझिकोड येथील 20 वर्षीय मॉडेल आणि अभिनेत्री तिच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहाना गुरुवारी रात्री तिच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळून आली. शहानाचा पती सज्जाद (३१) याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. कोझिकोड शहरापासून 14 किमी अंतरावर असलेल्या पारंबिल बाजार येथील राहत्या घरी शहाना खिडकीच्या रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत […]
शिवसेनेने त्यांच्या मूळ तत्वालाच गुंडाळून ठेवले आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांची शिवसेनेवर टीका
अहमदनगर : हनुमान चालीसा म्हणायला निघालेल्याना देशद्रोहाचे कलम लावायचे आणि तिकडे औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहणाऱ्यांच्या बाबतीत फक्त गाडण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेच्या फक्त तोंडात बळ आहे. त्यामुळे ते कृती करू शकत नाहीत, अशी टीका भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी येथे माध्यमांशी संवाद साधत होते. राधाकृष्ण विखे म्हणाले, एका बाजुला […]










