रांची : विमान वाहतूक नियामक DGCA ने इंडिगोला 5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. 7 मे रोजी रांची विमानतळावर एका अपंग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याप्रकरणी नियामकाने ही कारवाई केली आहे. इंडिगोने 9 मे रोजी सांगितले होते की, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने, एका वेगळ्या दिव्यांग मुलाला 7 मे रोजी रांची-हैदराबाद फ्लाइटमध्ये चढू दिले नाही कारण तो घाबरलेला […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
पुण्यात मेट्रोचे काम सुरु असल्याने 3 महिन्यांसाठी वाहतुकीत बदल, जाणून घ्या…
पुणे : पुणे शहरातील येरवडा वाहतुक विभागाच्या हद्दीत महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पेारेशन लि. यांच्यातर्फे सिव्हील कोर्ट ते रामवाडी दरम्यान पुणे मेट्रो रिच-3 या मार्गिकेवर एन. एम. चव्हाण चौक ते ऍडलॅब चौकादरम्यान महा मेट्रोचे रेल्वे स्टेशनचे काम सुरु आहे. ऍडलॅब चौकामध्ये गर्डर टाकण्याच्या कामाकरता 27 मे 2022 ते 26 ऑगस्ट 2022 पर्यत वाहतुकीत बदल करण्यात येणार […]
पुणे : म्हाडा पेपर फुटी प्रकरणात आणखी एक आरोपीला अटक
पुणे : म्हाडा भरती परीक्षापेपरफुटी प्रकरणाचा पर्दाफाश पुणे सायबर पाेलीसांनी केला. जी. ए. साॅफ्टवेअर टेक्नाॅलाॅजी प्रा.लि. कंपनीचा संचालक डाॅ. प्रितिश देशमुख याच्यासह अंकुश हरकळ, संतोष हरकळ या एजंट बंधूंना अटक याआधीच पोलिसांनी अटक केली होती. आता याप्रकरणात पोलिसांनी विजय बाबुलाल दर्जी या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत अकरा आरोपींना अटक करण्यात आली असून विजय […]
मान्सून आगमनाची तारीख बदलली; महाराष्ट्रात कधी दाखल होणार? जाणून घ्या…
मुंबई : केरळमध्ये १ जूनपर्यंत आणि महाराष्ट्रात ७ ते १० जून दरम्यान मान्सूनचे आगमन होणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतर मान्सूनचा पुढील प्रवास संथगतीने होईल असाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाने आधी केरळमध्ये मान्सून २७ मे पर्यंत पोहोचणार असा अंदाज वर्तविला होता. पण वातावरणातील बदलांचा आढावा घेऊन हवामान विभागाने […]
चारित्र्यावर संशय घेत वृद्धाने केली 65 वर्षीय पत्नीची हत्या…
लखनौ : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात ७५ वर्षीय पतीने ६५ वर्षीय पत्नीची हत्या केली. आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर खाटेखाली लपून बसलेल्या आरोपी पतीला अटक केली. असोथर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 75 वर्षीय पतीने आपल्या 65 वर्षीय पत्नीची हत्या केली आणि नंतर खाटाखाली […]
माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांची आत्महत्या, नातीचा विनयभंग केल्याचा होता आरोप
उत्तराखंड : उत्तराखंड सरकारमधील माजी मंत्री राजेंद्र बहुगुणा यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पाण्याच्या टाकीवर चढून बहुगुणा यांनी स्वतःवर गोळी झाडली. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला होता. बहुगुणा यांच्या सुनेने त्यांच्यावर नातीचा विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हल्दवानी सर्कल ऑफिसर (सीओ) भूपिंदर सिंग […]
कर कपातीनंतर काय आहेत मुंबई, दिल्लीत पेट्रोल, डिझेलचे दर? जाणून घ्या आजचे दर…
मुंबई : केंद्राने गेल्या आठवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी पुढाकार घेतल्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले. शनिवारी 27 मे रोजी, सकाळी 6 वाजता दररोजच्या अपडेटदरम्यान तेल विपणन कंपन्यांनी त्यांचे दर कमी किंवा वाढवले नाहीत. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती लक्षात घेऊन उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा वित्तमंत्री […]
IPL RR v RCB 2022 : राजस्थान रॉयल्स 14 वर्षांनंतर फायनलमध्ये, जोस बटलरचे धमाकेदार शतक, ऑरेंज कॅपसह नोंदवले बरेच विक्रम
अहमदाबाद : जोस बटलरने या सामन्यातही तुफानी खेळी साकारत शतक झळकावले आणि राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. बटलरचे हे या हंगामातील चौथे शतक ठरले आहे. त्याचबरोबर सर्वाधिक धावाही त्याच्याच नावावर आहेत. तसेच एका हंगामात सर्वाधिक शतके झळकावणारा तो पहिलाच परदेशी खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्याही परदेशी खेळाडूला आयपीएलमध्ये चार शतके झळकावता आली नव्हती. तर […]
१३३ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासंदर्भात दोघांना अटक
मुंबई : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने धडक कारवाईद्वारे १३३.६८ कोटीच्या रुपयांच्या खोटया बिलांद्वारे शासनाची १९.९३ कोटी रुपयांची महसूल हानी करणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. मे. देवराम ट्रेडर्स व मे. अपोलो एंटरप्राईज या व्यापाऱ्यांच्या उल्हासनगर व नालासोपारा येथील ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागाकडून करचोरी विरोधी २७ मे २०२२ रोजी विशेष अन्वेषण कारवाई […]
धक्कादायक! हिंगोलीतील तरुण शेतकऱ्याच्या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा, वडिलांनीच केली निर्घृण हत्या…
हिंगोली : शेतकरी देवानंद मुधोळ (वय 20) यांचा मागील आठवड्यात खुन झाला होता. आता या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. कळमनुरी तालुक्यातील गौळ बाजार येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या तरुण शेतकऱ्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या देवानंद यांच्या वडिलांनीच केल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपी वडिलांना आज (२७ मे) दुपारी ताब्यात घेतले आहे. […]









