Model and Makeup Artist Saraswati Das suicide
देश मनोरंजन

मॉडेल आणि मेकअप आर्टिस्ट सरस्वती दासची आत्महत्या, गेल्या 15 दिवसांतील चौथी घटना

पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही दिवसांत तीन मॉडेल्सच्या मृत्यूचे गूढ उकलत नव्हते, तोच आता आणखी एका मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टने आत्महत्या केली आहे. या मॉडेल आणि मेकअप आर्टिस्टचा मृतदेह कोलकाता, पश्चिम बंगालमधील तिच्या घरातून सापडला आहे. या मॉडेलचे नाव सरस्वती दास आहे. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती धडपडत होती, असे सांगितले जात आहे. पंधरा […]

UPSC
देश शैक्षणिक

ब्रेकिंग! UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल जाहीर, श्रुती शर्मा परीक्षेत अव्वल

UPSC Civil Services Final Result: UPSC नागरी सेवा परीक्षा 2021 चा अंतिम निकाल आज जाहीर झाला. आयोगाने जाहीर केलेल्या अंतिम निकालानुसार, श्रुती शर्मा हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या अंतिम निकालांतर्गत, अशा सर्व उमेदवारांची यादी करण्यात आली आहे ज्यांची शेवटी नियुक्तीसाठी निवड झाली आहे. UPSC नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेला […]

Ink thrown on BKU leader Rakesh Tikait in Bengaluru
देश

ब्रेकिंग! राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकली, कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ आणि हाणामारी

बेंगळुरू : आज बेंगळुरू येथे एका कार्यक्रमादरम्यान भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांच्यावर शाई फेकण्यात आली. टिकैत तेथे पत्रकार परिषद घेणार होते. कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ आणि हाणामारी देखील झाली. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत कर्नाटक दौऱ्यावर आहेत. बेंगळुरू येथील गांधी भवन येथे राकेश टिकैत पत्रकार परिषद घेणार होते. यावेळी राकेश टिकैत यांच्यावर एका […]

Accused arrested
पुणे महाराष्ट्र

पुणे : चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी घेतले ताब्यात

पुणे : चंदन तस्करी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी वाघोली बाजार तळाजवळ सापळा रचून आरोपी विठ्ठल भानुदास शिंदे (वय २३) याला ताब्यात घेतले. त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदारासह केल्याची कबुली दिल्याने त्याला नमूद गुन्हयात अटक करुन त्याची पोलीस कस्टडीची रिमांड घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील वेगवेगळया ठिकाणाहून चंदनाची झाडे कापून चोरून […]

No Survivors in Nepal Plane Crash; Army Working to Retrieve Bodies
ग्लोबल देश

नेपाळमधील विमान अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू, 4 भारतीय नागरिकांचा समावेश

नेपाळ : नेपाळमधील पोखरा या पर्यटन शहरातून उड्डाण केल्यानंतर हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात कोसळलेल्या तारा एअरच्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराला मुस्तांगमधील थासांग-२ च्या सनोसवेअरमध्ये दुर्घटनाग्रस्त विमान सापडले आहे. दरम्यान, विमानातील सर्व २२ जणांचा मृत्यू झाला आहे. नेपाळी लष्कराने याला दुजोरा दिला आहे. विमानात चार भारतीयही होते. यापूर्वी खराब हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे विमानाचा शोध […]

Another minor girl was raped
छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये खळबळ! जन्मदात्याकडून मुलीवर तब्बल अकरा वर्षे बलात्कार, ४० वर्षीय नराधमाला अटक

औरंगाबाद : वडिलांनी स्वत:च्याच मुलीवर अकरा वर्षे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी अगदी लहान असताना सुरू झालेला अत्याचार इतके वर्ष सहन केल्यानंतर अखेर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती पळून गेल्यानंतर अल्पवयीन असल्याने मुकुंदवाडी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तिचा शोध घेतला. मात्र, चौकशीत तिने ११ वर्षे वडिलांनी केलेल्या अत्याचाराबद्दल सांगितल्यानंतर […]

Minister Dadaji Bhuse
महाराष्ट्र

संशोधन शेताच्या बांधापर्यंत नेण्यासाठी कृषी विद्यापीठांना दरवर्षी 50 कोटी रुपये – दादाजी भुसे

अकोला : कृषी विद्यापीठांमध्ये होणारे संशोधन हे शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहोचवता यावे, यासाठी कृषी विद्यापीठांना दरवर्षी 50 कोटी रुपये विस्तार शिक्षणासाठी देण्यात येतील, असे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, कृषी विद्यापीठाला अमृत सरोवरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध झाले आहे,तथापि, हे पाणी वापरता यावे यासाठी राज्यशासन निधी देईल. शेतकऱ्यांनी उत्पादनाकडे लक्ष देतानाच आपले […]

An international standard sports university will be set up in Pune
क्रीडा पुणे महाराष्ट्र

पुण्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील पायाभूत सुविधायुक्त क्रीडा विद्यापीठ उभारणार

पुणे : महाराष्ट्र शासन खेळाला महत्व देत असून शहरी आणि ग्रामीण भागात खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाच्या पायाभूत सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. राज्यातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडविण्यासाठी पुण्यामध्ये लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा विद्यापीठ सुरू करण्यात येत आहे. यामुळे खेळाडूंना पायाभूत सुविधा उपलब्ध होतील आणि आपले क्रीडाकौशल्य विकसीत करण्याची संधी मिळेल, या […]

Ready to discuss farmers' issues, know all the points in Prime Minister Modi's address
देश शेती

शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी प्रयत्नशील, काय म्हणाले पंतप्रधान मोदी जाणून घ्या…

गुजरात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील गांधीनगरमध्ये सहकार से समृद्धी कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज आपण सहकाराच्या समृद्धीवर चर्चा करत आहोत. गावांच्या स्वावलंबनासाठी सहकार हे एक उत्तम माध्यम आहे. त्यात स्वावलंबी भारताची ऊर्जा आहे. स्वावलंबी भारताच्या उभारणीसाठी गावे स्वावलंबी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे पूज्य बापू आणि सरदार पटेल यांनी […]

development of Shrikshetra Mahurgad through the coordination of all concerned departments
नांदेड महाराष्ट्र

श्रीक्षेत्र माहूरगड विकासाला सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून चालना देऊ – अशोक चव्हाण

नांदेड : श्रीक्षेत्र माहूरगड विकासासाठी सन 2010 मध्ये 79 कोटी रुपयाच्या मूळ आराखड्यास मान्यता दिलेली आहे. यात धार्मिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, वाहतूक पायाभूत सुविधा, इतर आधारभूत पायाभूत सुविधा विकसीत करण्याचा अंतर्भाव केलेला आहे. याचबरोबर पुरातत्व, जलसंधारण, पाणी पुरवठा, वन विभाग, नगरपंचायत अशा अनेक विभागांच्या माध्यमातून माहूरगड विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सर्व विभागांच्या समन्वयातून […]