उत्तर प्रदेश : आजकाल छोट्या-छोट्या गोष्टींवरून अनेकांची लग्ने मोडल्याचा घटना समोर येतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील मंगलपूरमधून समोर आली आहे. नवरदेवाकडच्या लोकांनी फोटोग्राफर आणला नाही, म्हणून नवरीला राग आला आणि तिने लग्न करण्यास नकार दिला. अखेर फोटोग्राफरला न आणल्यामुळे लग्न मोडले. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूर जिल्ह्यातील मंगलपूर गावात शनिवारी रात्री वरपक्षाची मंडळी नाचत-गात लग्नासाठी पोहोचली. […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
रुग्णवाहिका ट्रकला धडकून भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील बरेली येथील फतेहगंज थाना परिसरात मंगळवारी एका रुग्णवाहिकेची ट्रकला धडक बसून झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. मृतांपैकी सहा जण आरोग्य तपासणीनंतर दिल्लीहून परतले होते. राममूर्ती रुग्णालयातील रुग्णवाहिका दिल्लीहून बरेलीकडे येत होती आणि राष्ट्रीय महामार्गावरील सांखा पुलाजवळ हा अपघात झाला. फतेहगंज पश्चिम परिसरात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिका चालकाचे […]
NCB अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली
मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला अटक करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे यांची चेन्नईला बदली करण्यात आली आहे. ऑर्डरनुसार, समीन वानखेडे यांना विश्लेषण आणि जोखीम व्यवस्थापन महासंचालनालय मुंबईहून चेन्नई डीजी, टॅक्सपेयर्स सर्व्हिस डायरेक्ट्रेट म्हणून पाठविण्यात आले आहे. कॉर्डेलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक प्रकरणात आरोपपत्र […]
पावसाळ्यात आपत्ती निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवा – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई
सातारा : जिल्ह्यातील डोंगरी भागात जास्त पाऊस होतो. संभाव्य धोका टाळण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे तात्पुरते स्थलांतर शाळांमध्ये करा. याबरोबरच सर्व विभागांनी संभाव्य आपत्तीच्या निवारणासाठी आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. शासकीय विश्रागृहात आयोजित जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी […]
आईचा सहा मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न, मुलांचा दुर्दैवी अंत…
रायगड : रायगड जिल्ह्यात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने टोकाचं पाऊल उचलत आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेत या चिमुकल्यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. महिलेनं कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बोरवाडी […]
मोठी बातमी! आप सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांना कोलकातास्थित कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराशी संबंधित प्रकरणात अटक केली. सूत्रांनी सांगितले की, ईडीने केजरीवाल सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना अटक करण्यात आली. आर्थिक चौकशी एजन्सीच्या तपासात असे समोर आले […]
पीएम केअर फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील १९ बालकांना किटचे वाटप
मुंबई : ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेंतर्गत कोरोना महामारीमुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत केली जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थितीत केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल. मुरूगन यांच्या हस्ते या योजनेअंतर्गत दिलेल्या लाभाचे सर्व कागदपत्रांचे किट या मुलांना वितरित करण्यात आले. मुंबई शहर जिल्ह्यातील कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी पीएम केअर […]
पुणे : गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : गुरुवारी (२ जून) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र पंपिंग कर एस.एन.डी.टी/चार जलकेंद्र, नवीन व जुने होळकर जवेंद्र येथील विद्युत/पंपींग विषयक आणि स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची काही कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (३ जून) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. पर्वती जलकेंद्र भाग – […]
राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल होणार, १ जूनला होणार शस्त्रक्रिया
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पायावर १ जून रोजी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यासाठी राज ठाकरे मंगळवारी लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. राज ठाकरे हे ५ जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, पायाच्या दुखण्यामुळे त्यांना अयोध्या दौरा रद्द करावा लागला होता. त्यानंतर राज ठाकरे यांच्या पायाची शस्त्रक्रिया होणार असल्याचे निश्चित झाले होते. अखेर […]
पीएम केअर फॉर चिल्ड्रेन : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांसाठी मोठी भेट, योजनेचे तपशील जाणून घ्या
नवी दिल्ली : मार्च 2020 मध्ये देशात आणि जगामध्ये कोरोना महामारीची सुरुवात झाल्यानंतर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातही कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात मुले अनाथ झाली आहेत. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक गमावले आहेत त्यांच्यासाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजना सुरू केली […]










