अहमदाबाद : राजस्थान रॉयल्ससाठी आज सर्वात महत्वाचा सामना सुरु होणार आहे. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच राजस्थानसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राजस्थानच्या संघासाठी आजचा सामना सर्वात महत्वाचा असेल. कारण यापूर्वीच्या सामन्यात राजस्थआनला गुजरातकडून पराभवाचा धक्का बसला होता. पण पराभवानंतरही त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची नामी संधी आहे. या सामन्यात खेळपट्टी कशी असेल हे सर्वात महत्वाचे […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ब्रेकिंग! लडाखमध्ये भारतीय लष्कराची गाडी श्योक नदीत पडली, 7 जवान शहीद
लडाख : लडाखच्या तुर्तुक सेक्टर येथे झालेल्या वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि इतर काही गंभीर जखमी झाले आहेत, याबाबत ANI ने वृत्त दिले आहे. गंभीर जखमींना वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यासाठी IAF कडून हवाई प्रयत्नांची मागणी करण्यासह जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. […]
मोठी बातमी! समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार, क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात आढळल्या अनेक त्रुटी
मुंबई : क्रूझ डग्स प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. त्याचवेळी आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या ढिसाळ तपासासाठी कारवाई करण्यात आली आहे. समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकार आधीच कारवाई करत आहे. […]
बेहिशोबी मालमत्ता प्रकरण : माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना 4 वर्षांचा तुरुंगवास
हरियाणा : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना शुक्रवारी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांचा तुरुंगवास आणि 50 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. चौटाला (87) यांना दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने गेल्या शनिवारी (21 मे) या प्रकरणात दोषी ठरवले होते. तुरुंगवास आणि दंडाव्यतिरिक्त चौटाला यांच्या मालकीच्या चार मालमत्ता जप्त केल्या जातील, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. […]
वीज पडण्याचा इशारा देणारे ‘दामिनी ऍप’, आजच आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करा…
लातूर : वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच, तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते […]
आरोग्य सुविधेचे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय ठरेल – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे : प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ‘सेवा कमतरता विश्लेषण’ (गॅप ॲनालिसिस) योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेल्या या उपकरणांमुळे जिल्ह्याची आरोग्य सेवा अधिक भक्कम आणि बळकट होण्यास होईल. ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेचे हे ‘पुणे मॉडेल’ राज्यात लोकप्रिय होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. विधानभवन येथे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी ‘गॅप ॲनालिसिस’ योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या […]
केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात, अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती
मुंबई : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. राणे यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. नारायण राणे रुटीन चेकअपसाठी लिलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी त्यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये काही ब्लॉकेजेस असल्याचं दिसलं. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यावर आज […]
अभिनेत्री मंजूषा नियोगी राहत्या घरी मृतावस्थेत आढळली, मनोरंजन विश्वात खळबळ…
मुंबई : आणखी एका बंगाली अभिनेत्रीनं आत्महत्या केल्याचं समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या १५ दिवसांत तीन अभिनेत्रींनी आत्महत्या केली आहे. बंगाली सिनेअभिनेत्री आणि मॉडेल मंजूषा नियोगी हिने आज राहत्या घरी आत्महत्या केली आहे. मंजुषाच्या आईने दावा केला आहे की, तिची मैत्रिण आणि सहकारी बिदिशा डे मजूमदारच्या मृत्यूनंतर ती तीव्र नैराश्याने […]
ब्रेकिंग! आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी कडून क्लीन चिट
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला हाय-प्रोफाइल मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात ‘क्लीन चिट’ दिली आहे. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानच्या मुलाला गेल्या वर्षी मुंबईच्या किनाऱ्यावर एका क्रूझवर छापा टाकल्यानंतर आणि ड्रग्ज सापडल्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला जामीन देण्यात आला. ‘पुराव्याअभावी’ सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही, तर १४ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले […]
पालघरमधील वाघोबा घाटात बसचा भीषण अपघात, 15 प्रवासी जखमी
पालघर : पालघरमधील वाघोबा घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला. सकाळी 6.30 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नाशिकहून आलेली ही बस थेट 20 फुट दरीत कोसळली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पालघरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीची […]










