cruise drugs case : Govt orders action against ex-NCB officer Sameer Wankhede
महाराष्ट्र मुंबई

मोठी बातमी! समीर वानखेडे यांच्यावर कारवाई होणार, क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासात आढळल्या अनेक त्रुटी

मुंबई : क्रूझ डग्स प्रकरणी एनसीबीच्या आरोपपत्रात आर्यन खानला क्लीन चिट मिळाली आहे. त्याचवेळी आर्यन खान प्रकरणाचे तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सरकारने कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB चे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्या ढिसाळ तपासासाठी कारवाई करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

समीर वानखेडे यांच्या बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणात सरकार आधीच कारवाई करत आहे. NCB ने शुक्रवारी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझवर सापडलेल्या ड्रग्ज प्रकरणी क्लीन चिट दिली. या प्रकरणी केवळ 14 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले असून, पुराव्याअभावी आर्यनसह 6 जणांची सुटका करण्यात आली आहे.

तपासात आढळल्या अनेक त्रुटी

याप्रकरणी एनसीबीच्या दक्षता पथकाचा अहवालही लवकरच येऊ शकतो, त्यानंतर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते. वानखेडे यांनी ज्या पद्धतीने प्रकरण हाताळले त्यात अनेक त्रुटी आढळून आल्या. या प्रकरणी दक्षता पथक लवकरच अहवाल देऊ शकते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत