जकार्ता : आशिया चषक हॉकी स्पर्धेतील पहिले चार संघ हे विश्वचषकासाठी पात्र ठरणार होते. भारताने पाकिस्तानला मागे सारून अव्वल चारमध्ये प्रवेश केला. त्यामुळे पाकिस्तानच्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरण्याच्या अपेक्षाही धुळीस मिळाल्या. भारताच्या नवोदित हॉकीपटूंनी आक्रमक खेळाच्या जोरावर आशिया कप हॉकी स्पर्धेत इंडोनेशियाचा धुव्वा उडवून अव्वल चार संघांत स्थान मिळवले. पाकिस्तानला मागे टाकून अव्वल चार संघांत […]
लेखक: थोडक्यात घडामोडी टीम
ट्रेलब्रेझर्स संघाचा १६ धावांनी दमदार विजय, तरीही व्हेलॉसिटी संघाला मिळालं फायनलचं तिकीट
पुणे : पुण्यातील एमसीए स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या महिला टी20 चॅलेंज 2022 च्या अंतिम फेरीसाठी व्हेलॉसिटी संघ पात्र ठरला. हा सामना ट्रेलब्रेझर्स संघाने १६ धावांनी जिंकला. या विजयात सब्भीनेनी मेघना आणि जेमिमाह रोड्रिगेज यांनी मोलाचे योगदान दिले. जेमिमाहला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. मात्र, पराभूत होऊनही वेलोसिटी संघाने अंतिम सामन्यात धडक मारली. या सामन्यात वेलोसिटी संघाने नाणेफेक […]
स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे IAS दाम्पत्याला पडले महागात, केंद्रीय गृहमंत्रालयाने केली ‘ही’ कारवाई…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील त्यागराज स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवणे आयएएस अधिकारी आणि त्यांची आयएएस पत्नी दोघांनाही महागात पडले आहे. स्टेडियममध्ये कुत्र्याला फिरवण्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने दोन्ही अधिकाऱ्यांची बदली केली आहे. त्यागराज स्टेडियममधील सुविधांचा गैरवापर केल्याप्रकरणी संजीव खिरवार आणि त्यांची पत्नी रिंकू दुग्गा यांना दिल्लीहून लडाख आणि अरुणाचल प्रदेशात हलवण्यात आले आहे. आयएएस […]
अहमदनगर जिल्ह्यातील १०४२ जलस्त्रोतांचे होणार पुनरुज्जीवन
अहमदनगर : सिंचनातून समृद्धी वाढविण्यासाठी राज्य सरकारने दोन वर्षांपूर्वी हाती घेतलेली मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक तलावांची डागडुजी, दुरुस्ती करुन साठवण क्षमता व सिंचन क्षमता पुनरस्थापित करण्यात येणार आहे, असे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी सांगितले. ‘मुख्यमंत्री जलसंधारण योजनेच्या अंमलबजावणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसमवेत मंत्री गडाख यांनी […]
महाराष्ट्रातील १० विधान परिषदेच्या जागांसाठी २० जूनला निवडणूक
नवी दिल्ली : महाराष्ट्रातून विधानपरिषदेवर रिक्त होत असलेल्या 10 जागांसाठी 20 जून रोजी निवडणूक होणार असून, अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक 9 जून आहे. महाराष्ट्रसह उत्तर प्रदेश आणि बिहार विधान परिषदेतून 06 जुलै 2022 ते 21 जुलै 2022 या कालावधी दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांच्या जागा भरण्यासाठी विधानपरिषदांच्या द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम, निवडणूक आयोगाकडून बुधवारी रात्री जाहीर करण्यात […]
मुलाच्या निरोगी वाढीसाठी दोन्ही पालकांसोबतचा वेळ आवश्यक – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई : मुलाला आई-वडिलांच्या दोघांच्या प्रेमाची आणि आपुलकीची गरज असते, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले. आपल्या पत्नीशी मुलाच्या कस्टडीबाबत असलेल्या भांडणात अलीकडेच एका वडिलांना रात्रभर मुलाकडे जाण्याची परवानगी देताना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. वडिलांना मुलाकडे रात्रभर प्रवेश देण्याच्या ट्रायल कोर्टाच्या आदेशाविरुद्ध मुलाच्या आईने सुट्टीतील न्यायाधीश मिलिंद जाधव यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी मुलांना त्यांच्या […]
मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाकडून वेश्याव्यवसायाला ‘व्यवसाय’ म्हणून मान्यता, केल्या ‘या’ महत्वाच्या सूचना
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिसांना सेक्स वर्कर्सच्या कामात ढवळाढवळ न करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने सेक्स वर्क हा व्यवसाय मानताना सांगितले की, प्रौढ आणि सहमतीने सेक्स वर्क करणाऱ्या महिलांवर पोलिसांनी फौजदारी कारवाई करू नये. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, लैंगिक कर्मचार्यांना देखील कायद्यानुसार सन्मान आणि समान संरक्षण मिळण्याचा हक्क […]
कोरोना रुग्णसंख्येत वाढ, मास्क वापरा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या ‘या’ सूचना
मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले. राज्याची साप्ताहिक पॉझिटीव्हीटी 1.59 टक्के असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पॉझिटीव्हीटी आढळते. मुंबईत रुग्णसंख्येत 52.79 टक्के वाढ झाली असून ठाण्यामध्ये 27.92 टक्के तर रायगड आणि […]
राज्यातील धरणांमध्ये 37 टक्के जलसाठा शिल्लक, टंचाईग्रस्त भागात टँकर्सद्वारे पाणी पुरवठा
मुंबई : राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पात 25 मे अखेर 36.68 टक्के एवढा जलसाठा शिल्लक असून गतवर्षीच्या याच काळात हे प्रमाण 36.27 टक्के एवढे होते. तसेच राज्यातील टंचाईग्रस्त भागात 401 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राज्यातील उपलब्ध जलसाठ्यातून नागरिकांना सुरळीतपणे पाणी पुरवठ्यासाठी शासन जलसाठयाचे नियोजन करत आहे. यासाठी वेळोवळी जलसाठ्याचा आढावा घेऊन […]
सारथी संस्थेस खारघरमध्ये भुखंड उपलब्ध करुन देणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
मुंबई : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेस नियोजन विभागामार्फत नवी मुंबईतील खारघर सेक्टर 37, मधील 3 हजार 500 चौ.मी.क्षेत्रफळाचा भूखंड देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. राज्य शासनाने मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी या […]










